ट्रकमधून चोरी करणारे दोघे जेरबंद

By Admin | Updated: June 7, 2017 16:14 IST2017-06-07T16:14:24+5:302017-06-07T16:14:24+5:30

एलसीबीच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

Two robbers steal from the truck | ट्रकमधून चोरी करणारे दोघे जेरबंद

ट्रकमधून चोरी करणारे दोघे जेरबंद

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.7 - रस्त्यावर लावलेल्या ट्रकमधून चोरी करणा:या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 33 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 
अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्य मार्गावर तळोदानजीक गॅरेजवर रात्रीच्या वेळी ट्रक उभी केली होती. रात्री 1 वाजेच्या सुमारास चालक संदीप मोरे हे कॅबीनमध्ये झोपले असतांना कॅबीनमध्ये कुणीतरी घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले असता दोनजण काहीतरी शोधण्याचा प्रय} करीत होते. चालक मोरे यांना त्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोख 400 रुपये चोरून नेले. चालकाने खाली उतरून ट्रकची तपासणी केली असता दोघांनी बॅटरी देखील काढून घेतली होती. चालकाने तात्काळ तळोदा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात कन्हैया तनपुरे व केदार यांच्या घरावर छापे टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 

Web Title: Two robbers steal from the truck