सारंगखेडानजीक अपघातात दोनजण ठार
By मनोज शेलार | Updated: January 31, 2024 18:29 IST2024-01-31T18:29:21+5:302024-01-31T18:29:56+5:30
याबाबत सारंगखेडा पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे.

सारंगखेडानजीक अपघातात दोनजण ठार
मनोज शेलार, नंदुरबार : कापूस भरलेल्या पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना सारंगखेडानजीक बुधवारी सकाळी घडली. याबाबत सारंगखेडा पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे.
अपघातात ठार झालेल्यांमध्ये विजय इंदा पवार (५५) रा.अमोदा, ता.शहादा व धरासिंग दिनकर मोरे (६०) रा. शिरूड, ता. शहादा यांचा समावेश आहे. पवार हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ४२ एन १७१२) शहाद्याकडून सारंगखेडाकडे जात असताना सारंगखेडाकडून कापूस भरलेले पिकअप वाहन (क्रमांक एमएच १३ सीयू ३८०२) भरधाव जात होते. सप्तशृंगी हॉटेलजवळ पिकअपने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलिस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत सारंगखेडा पोलिस ठाण्यात कुशा ठग्या पवार (५५) रा. वीरपूर ता. शहादा यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिस स्टेशनला पिकअप चालक जितेंद्र राजेंद्र वाणी रा. वडणे, ता. धुळे यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.