नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 21:46 IST2020-05-31T21:46:11+5:302020-05-31T21:46:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हिंगणी ता़ शहादा येथील युवकासह नंदुरबार शहरातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ ...

Two patients of corona in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हिंगणी ता़ शहादा येथील युवकासह नंदुरबार शहरातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिला असून हिंगणी आणि शहरातील नागाई नगरात कंटेन्मेंट झोन तयार करण्यास सुरुवात झाली आहे़
हिंगणी येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते़ बाधिताच्या संपर्कातील व्यक्तीेंचे स्वॅब नमुने घेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ यातील २९ वर्षीय युवकाच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ सोबत नंदुरबार शहरातील नागाई नगरात राहणाऱ्या ४१ वर्षीय पुरुषाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे़ संबधित व्यक्तीने एक महिन्यापूर्वी मुंबई येथे प्रवास केल्याचे सांगण्यात आले आहे़ शहरातील एका खाजगी दवाखान्यात गेल्यानंतर दक्षता म्हणून त्याचे स्वॅब नमुने घेत होम क्वारंटाईन करण्यात आले होते़ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ हिंगणी येथील युवकाला ही नंदुरबार येथे आणले जात आहे़ दोघांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरु झाली असून त्यांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन कक्षात रवानगी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे़

Web Title: Two patients of corona in Nandurbar district