दोन सदस्यीय पथकाची राहणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:46 PM2020-08-09T12:46:29+5:302020-08-09T12:46:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारणे आणि म.फुले जनआरोग्य योजनेची ...

The two-member squad will keep an eye on it | दोन सदस्यीय पथकाची राहणार नजर

दोन सदस्यीय पथकाची राहणार नजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारणे आणि म.फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी याबाबत तपासणीसाठी दोन जणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे.
पथकात वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ.शिवाजी सुकरे व महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.ठाकरे यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना म. जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय २३ मे रोजी घेण्यात आला आहे.
३० जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र अद्यापही, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा या भरारी पथकांमार्फत करण्यात येईल. खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.
आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत राज्यस्तरावरून अनेकवेळा मागणी झाली होती. त्याची दखल घेण्यात आली आहे.


प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे पथक स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. त्याबाबतचा आदेश ७ आॅगस्ट रोजी पारीत झाला आहे. त्यानुसार नंदुरबारात दोन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात खाजगी स्वरूपात उपचाराची सोय चार दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. आतापर्यंत ही सोय जिल्ह्यात नव्हती.

Web Title: The two-member squad will keep an eye on it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.