नंदुरबारमध्ये बेशिस्त वाहनधारकांकडून दोन लाख दंड वसूल

By Admin | Updated: July 6, 2017 13:06 IST2017-07-06T13:06:58+5:302017-07-06T13:06:58+5:30

एका महिन्यातील कारवाई : चार मद्यपी चालकांनाही दंड

Two lakh fine collected from unskilled vehicle holders in Nandurbar | नंदुरबारमध्ये बेशिस्त वाहनधारकांकडून दोन लाख दंड वसूल

नंदुरबारमध्ये बेशिस्त वाहनधारकांकडून दोन लाख दंड वसूल

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.6- शहरातील विविध भागात गेल्या महिनाभरात वाहतूक शाखेच्या कर्मचा:यांनी केलेल्या कारवाईत दोन लाख 21 हजार 300 रुपयांची दंडवसुली करण्यात आली आह़े या कारवाईत चार मद्यपी वाहनधारकांचा समावेश आह़े 
नंदुरबार शहरात वाहतुकीची समस्या गेल्या काही वर्षात वाढली आह़े वाढलेली वाहने आणि अरुंद रस्ते यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत़ यातच बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणारे, विनापरवाना वाहनधारक, अवैध पार्किग करणा:या वाहनधारकांवर गेल्या महिनाभरात शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा:यांनी मोहीम उघडली होती़ या मोहिमेत वाहनधारकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली़ 1 ते 30 जून या वेळेत ही मोहीम राबवण्यात येत होती़ यात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली़ 

Web Title: Two lakh fine collected from unskilled vehicle holders in Nandurbar