वेगवेगळ्या घटनेत दोन युवतींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:11 IST2019-05-06T12:10:46+5:302019-05-06T12:11:01+5:30
नंदुरबार : नंदुरबारसह हिंगणी, ता.शहादा येथील युवतींना पळवून नेल्याप्रकरणी नंदुरबार व सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार ...

वेगवेगळ्या घटनेत दोन युवतींचे अपहरण
नंदुरबार : नंदुरबारसह हिंगणी, ता.शहादा येथील युवतींना पळवून नेल्याप्रकरणी नंदुरबार व सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील येडमाय-फुलमाय टेकडी परिसरात राहणारी युवती ३ मे रोजी घरातून बेपत्ता झाली. तिला काहीतरी अमिष दाखवून कुणीतरी अपहरण केल्याची शंका उपस्थित करून तिच्या पालकांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदा बिºहाडे करीत आहे.
दुसरी घटना नवी हिंगणी, ता.शहादा येथे घडली. गावातील युवतीला तेथेच राहणाऱ्या इंद्रसिंग अभय भिल याने पळवून नेल्याची फिर्याद युवतीच्या पालकांनी दिली. ३ मे रोजी तिला गावातीलच इंद्रसिंग अभय भिल याने काहीतरी अमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद युवतीच्या पालकांनी दिली. इंद्रसिंग भिल याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार बागले करीत आहे.