शहाद्यात किरकोळ कारणावरून हाणामारी दोन घरांचे नुकसान पाचजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:26 IST2018-02-12T12:25:40+5:302018-02-12T12:26:25+5:30

Two houses have been injured in Shahada due to minor reasons | शहाद्यात किरकोळ कारणावरून हाणामारी दोन घरांचे नुकसान पाचजण जखमी

शहाद्यात किरकोळ कारणावरून हाणामारी दोन घरांचे नुकसान पाचजण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील भाजी मार्केट परिसरात रस्त्यावर दुचाकी लावण्याच्या वादातून रविवारी पहाटे दोन गटात हाणामारी झाली. त्याचे पडसाद सकाळी देखील उमटल्याने दोन घरांची नासधूस करण्यात आली. शिवाय मारहणीत पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी पहाटे दीड वाजता मार्केट परिसरातील भूरा विश्राम पवार व पुरुषोत्तम विश्राम पवार यांच्यात दुचाकी उभी करण्यावरून वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यावेळी 20 ते 30 तरुण देखील आले व त्यांनीही मारहाण केली. त्यात गणेश पवार व सुरेश पवार जखमी झाले. परेश पवार यालाही मारहाण करण्यात आली. परेश पवार यांच्या फिर्यादीवरून भूरा पवार व पुरुषोत्तम पवार यांच्यासह 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री दीड वाजता घडलेल्या या घटनेचे पडसाद सकाळी साडेनऊ वाजता उमटले. यावेळी जमावाने लाठय़ा, काठय़ा, धा:या, तलवारी घेवून चाल करून आल्याची फिर्याद भूरा विश्राम पवार याने दिली. गणेश पवार, काल्या ठाकरे, भु:या ठाकरे, दिपक नसीर, सागर ठाकरे, जितेंद्र भगरे, परेश पवार, काल्या ठाकरे व जमावाने चाल करीत घरांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली. दोन घरांमध्ये घुसून सामानाची नासधूस केली. भाजी मार्केटच्या मुख्य रस्त्यावर देखील या घटनेचे पडसाद उमटले. तेथील चहाची टपरी व पानठेल्याचे नुकसान करण्यात आले. परिणामी व्यापा:यांनी तातडीने आपले दुकाने बंद केली. दोन्ही गटातर्फे परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली.

Web Title: Two houses have been injured in Shahada due to minor reasons