नंदुरबारात दोन गटात हाणामारी, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:08 IST2018-02-15T12:08:47+5:302018-02-15T12:08:53+5:30

Two groups injured in Nandurbar, two injured | नंदुरबारात दोन गटात हाणामारी, दोन जखमी

नंदुरबारात दोन गटात हाणामारी, दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :मागील भानगडीच्या वादातून शहरातील कसाई मोहल्ला भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दोनजण जखमी झाले आहेत. परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
कसाई मोहल्ला भागातील शेख मुस्तकिन शेख शब्बार व अश्पाक अब्दुल यांच्यात जुन्या भानगडीचा वाद होता. त्या वादाचे पर्यावसान पुन्हा मारहाणीत झाले. अश्पाक अब्दुल व यांनी चौघांच्या मदतीने शेख मुस्तकिन शेख शब्बार यांच्या घरात घुसून लाकडी दांडका आणि हाताबुक्यांनी इब्राहिम अली कुरेशी यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. शेख मुस्तकिन शेख शब्बार यांच्या फिर्यादीवरून अश्पाक अब्दुल, रिजवान कमर बेग, बाशीर ईस्माईल व कासम सर्व रा.कसाई मोहल्ला यांना अटक करण्यात आली आहे. 
दुसरी फिर्याद नाजीम अलताफ शेख कुरेशी यांनी दिली. मागील भानगडीच्या वादातूनच फारूक पहेलवान, रिसशेख शफी, आमीन पारू कुरेशी, बबल्या पारू कुरेशी यांनी घरात घुसून आबीद यास लाकडी दांडका आणि हाताबुक्यांनी जबर मारहाण केली. शिविगाळ करून ठार मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यात फारूक पहेलवान, आमीन पारू कुरेशी, अश्पाक अब्दुल व रिजवान कमर बेग यांचा समावेश आहे. 
ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.     

Web Title: Two groups injured in Nandurbar, two injured