किरकोळ कारणातून नंदुरबारात दोन गटात बेदम हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:28 IST2020-05-08T12:27:42+5:302020-05-08T12:28:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणावरून नंदुरबारातील कुरेशी मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत दोनजण जखमी झाले. परस्पर ...

 Two groups clashed in Nandurbar for petty reasons | किरकोळ कारणातून नंदुरबारात दोन गटात बेदम हाणामारी

किरकोळ कारणातून नंदुरबारात दोन गटात बेदम हाणामारी


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणावरून नंदुरबारातील कुरेशी मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत दोनजण जखमी झाले. परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील चार जणांना अटक केली आहे.
मारहाणीत दोन्ही गटातर्फे चाकू, लाठ्या, काठ्यांचा वापर करण्यात आला. कुरेशी मोहल्यात दोन गटात जुन्या भानगडीचा वाद होता. त्यातून बुधवारी रात्री दोन्ही गट समोरासमोर आले. चाकू आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. याबाबत नायबान जाहीरखान कुरेशी यांच्या फिर्यादीवरून शेख इस्तीयास अब्दुल रज्जाक, शेख रोनक मुस्ताक, शेख अखलाक शेख मुस्ताक, शेख रशिद अब्दुल रजाक, शेख शफी शेख इसाद, शेख खलिल शेख इसाक, शेख मोहम्मद शेख रफा, शेख फयाज शेख अशफाक, शेख जमिल शेख इसाब, शेख रुपा शेख रशिद, शेख हारून शेख रजाक, शेख अल्ताब शेख जमिल, शेख कल्ली शेख जमिन, शेख मुस्ताक अब्दुल रज्जाक सर्व रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास फौजदार पी.पी.सोनवणे करीत आहे.
दुसरी फिर्याद कसाई अब्दुल रशिद अब्दुल रज्जाक यांनी दिली. मागील भानगडीच्या कारणावरून जमावाने लाकडी काठ्यांनी तसेच लोखंडी सळीने जबर मारहाण केली. कसाई त्यावरून फारूखखान जहीर खान कुरेशी उर्फ पप्पू कुरेशी, नायबखान जहीरखान कुरेशी, फिरोजखान कुरेशी, सिकंदरखान जहीरखान कुरेशी, राजू उर्फ फिरदोसखान जहीरखान कुरेशी, शेख असलम शेख अक्रम कुरेशी, शोएब शेख अक्रम कुरेशी, शेख अजहर शेख अक्रम कुरेशी, कुरेशी भुऱ्या शेख अया शेख जसीम शेख हन्नू कुरेशी, शेख अशरफ शेख अलियद पठाण, शेख अकील शेख अब्दुल कुरेशी, शेख कलिया शेख सईद चद्दरवाला, शेख अल्ताफ शेख अबीद कुरेशी, शेख अबीन शेख गुफरान, शेख जहीरखान उस्मान खान पठाण सर्व रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय याच घटनेतील काहीजण पोलीस ठाण्याच्या आवारात देखील हाणामारी करतांना दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध देखील तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकुण ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातर्फे देण्यात आली. तपास फौजदार पी.जे.पाटील करीत आहे.


 

 

Web Title:  Two groups clashed in Nandurbar for petty reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.