खान्देशात थंडीचे २ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:05 IST2017-12-27T05:04:45+5:302017-12-27T05:05:01+5:30

नंदुरबार : खान्देशात थंडीचा कडाका कायम असून नंदुरबार तालुक्यात थंडीने दोघांचे बळी घेतले आहेत. राज्यात किमान तापमानात मात्र लक्षणीय घट झाली आहे.

Two fall in cold weather | खान्देशात थंडीचे २ बळी

खान्देशात थंडीचे २ बळी

नंदुरबार : खान्देशात थंडीचा कडाका कायम असून नंदुरबार तालुक्यात थंडीने दोघांचे बळी घेतले आहेत. राज्यात किमान तापमानात मात्र लक्षणीय घट झाली आहे.
राजू दाजमल भिल (२७), देवीसिंग वेडू ठाकरे (७५) यांचे सोमवारी सकाळी मृतदेह आढळले. दोघेही उघड्यावर झोपलेले होते. थंडीने गारठून त्यांचा मृत्यू झाला. विदर्भातील काही भागात किमान तापमानाच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ मध्य महाराष्ट्र व कोकणातील तापमान सरासरीएवढे आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़

Web Title: Two fall in cold weather