वेडापावला येथे दुचाकी अपघात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:35 IST2019-04-05T11:35:04+5:302019-04-05T11:35:09+5:30

फरशीपुलाला धडक : उपचारादरम्यान मृत्यू

Two accidental youth killed in Vedapavala | वेडापावला येथे दुचाकी अपघात युवक ठार

वेडापावला येथे दुचाकी अपघात युवक ठार

नंदुरबार : तालुक्यातील वेडापावला गावाजवळ भरधाव वेगातील दुचाकी फरशीपुलावर धडकून १५ वर्षीय युवक ठार झाला़ बुधवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात घडला़
मौलीपाडा ता़ नवापूर येथील भाविक सुमन वळवी हा विना नंबरच्या दुचाकीने जात असताना वेडापावला शिवारात त्याला डुलकी आली़ यात दुचाकी फरशीपुलावर धडकून तो गंभीर जखमी झाला़ छातीस व डाव्या हातास गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला़ याबाबत ऋतिक विनायक वळवी यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मयत भाविक वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वळवी करत आहेत़

Web Title: Two accidental youth killed in Vedapavala