शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा वगळता इतर पाचही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा पाच ते 22 टक्के अधीक पाऊस झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा वगळता इतर पाचही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा पाच ते 22 टक्के अधीक पाऊस झाला आहे. जिल्ह्याची सरासरी देखील तब्बल 107 टक्क्यांवर पोहचली आहे. गेल्या 26 वर्षात पावसाळा संपण्याच्या आधीच सरासरी ओलांडण्याची जिल्ह्याची ही पहिली वेळ आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमध्ये देखील 90 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा आहे. जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक आहे. तब्बल 26 वर्षानंतर जिल्ह्यात एवढा पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी 10 सप्टेंबर्पयत केवळ 52.31 टक्के पाऊस झाला होता. यंदा सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाल्याने पीक पाण्याची स्थिती समाधानकारक असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.अक्कलकुवा शंभरीच्या आतजिल्ह्यातील सहापैकी पाच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाला आहे. केवळ अक्कलकुवा तालुक्यातच 96.87 टक्के पाऊस झाला आहे. लवकरच अक्कलकुवाही सरासरी पार करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पाऊस तळोदा तालुक्यात 122.26 टक्के झाला आहे.  सर्वात कमी अर्थात अक्कलकुवा तालुक्यात 96.87 टक्के पाऊस झाला आहे. धडगाव तालुक्यात 121.14 टक्के, नंदुरबार तालुक्यात 114.30 टक्के, शहादा तालुक्यात 112.76 तर नवापूर तालुक्यात 105.31 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा दुप्पटगेल्या वर्षी 10 सप्टेंबर्पयत अवघा 52 टक्के पाऊस झाला होता. यंदा तब्बल 107 टक्के पाऊस झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी या तारखेर्पयत एकाही तालुक्याची सरासरी 65 टक्केपेक्षा अधीक गेली नव्हती. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला होता. लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये देखील अवघा 30 ते 35 टक्के पाणीसाठा झाला होता. परतीचा पाऊस थोडाफार चांगला झाल्याने एकुण पावसाची सरासरी 67 टक्केर्पयत गेली होती. यंदा सरासरीचा 25 ते 30 टक्के अधीक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रकल्पामध्ये पाणीसाठा..जिल्ह्यात 37 लघु व चार मध्यम प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प मिळून सरासरी 90 ते 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. चारही मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहेत तर 26 लघु प्रकल्प देखील पुर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे यंदा जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासह खरीप हंगामाला देखील मदत होणार आहे. यामुळे शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक विहिरी ओव्हरफ्लोनंदुरबारसह तळोदा, नवापूर तालुक्यातील अनेक भागातील विहिरी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. काटोकाट भरलेल्या विहिरींमुळे शेतकरी देखील समाधानी असून रब्बीची चिंता आता मिटली आहे. 

सप्टेंबरअखेर्पयत सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सरासरीचा आणखी 15 ते 25 टक्के पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता यंदा तब्बल सव्वाशे टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची ही आकडेवारी रेकार्डब्रेक राहणार आहे. नेहमीच टंचाईला सामोरे जाणा:या गावांनाही यंदाच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेला पाऊस

    तालुका    वार्षिक    गेल्यावर्षी    यंदा मि.मि.    यंदा टक्केवारी        नंदुरबार    644.80    64.77    737.00        114.30  टक्के    नवापूर    1122.90    47.59    1182.70      105.33   टक्के    शहादा    686.10     56.20    773.65         112.76   टक्के        तळोदा    772.70    51.27      944.67       122.26   टक्के        धडगाव    761.40    50.84    922.34       121.14   टक्के        अ.कुवा    1027.10    51.28    994.91       96.87   टक्के      जिल्हा    835.83    52.31    895.69       107.83  टक्के