आदिवासी विद्याथ्र्याना नवनिर्मितीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:56 IST2019-09-26T11:56:43+5:302019-09-26T11:56:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विद्यापीठाच्या ‘सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट’उपक्रमांतर्गत बाल विज्ञान मेळाव्यात 110 विद्याथ्र्यानी सहभाग घेतला. मेळाव्यात आदिवासी ...

Tribal students seek renovation | आदिवासी विद्याथ्र्याना नवनिर्मितीचा ध्यास

आदिवासी विद्याथ्र्याना नवनिर्मितीचा ध्यास

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : विद्यापीठाच्या ‘सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट’उपक्रमांतर्गत बाल विज्ञान मेळाव्यात 110 विद्याथ्र्यानी सहभाग घेतला. मेळाव्यात आदिवासी विद्याथ्र्याना नेहमीच अवघड वाटणा:या विज्ञान विषयावर भर देण्यात आला. तर विद्याथ्र्यानीही वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून  आधुनिकतेचे धडे घेतले.
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सिलेज बेस्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, विज्ञान प्रसार संस्था व पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने आदिवासी विद्याथ्र्यासाठी विज्ञानावर आधारित उपक्रम हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत शहादा येथे विज्ञान मेळावा घेण्यात आला. यावेळी विज्ञान प्रसार संस्थेच्या प्रकल्पाधिकारी डॉ.इरफाना बेगम, साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे प्रा.मकरंद पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य प्रा.आर.एस. बेंद्रे, प्राचार्य डॉ.आर.आर. अहिरे, डॉ.सचिन नांद्रे, डॉ.ए.एच. जोबनपुत्रा, प्राचार्य  आर.एस. पाटील आय.जे.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल,  डॉ.एस.डी. सिंदखेडकर, डॉ.एच.एल तिडके, डॉ.प्रशांत जगताप, प्रा.सुरेखा पाटील, डॉ.उदय कुलकर्णी, प्रा.डी.एन. वाघ, डॉ.एस.आर. गोसावी, डॉ.योगेश वासू आदी उपस्थित होते. उद्घाटन दरम्यान प्रा.पाटील यांनी विद्याथ्र्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानात सापडणार असल्याचे म्हणत मानवी जीवनात बहुपर्यायी भ्रमणध्वनीसह जगासाठी विनाशकारी ठरणारा अणूबॉँबही विज्ञानातूनच आल्याचे पटवून दिले. मेळाव्याच्या दुस:या दिवशी आर.एस. पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्याथ्र्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगत विद्याथ्र्यानी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. यासाठी संस्थाध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, पी.आर. पाटील यांचे सहकार्य लाभले.  मेळाव्यात काही विद्यार्थ्यनी अनुभव कथन केले. 

चांद्रयान-2 सह अंतराळ संशोधनाची माहिती डॉ.आय.जे.पाटील यांनी दिली.
विद्याथ्र्यानी विज्ञानावर आधारित जीवन पद्धती जाणून घेतली.
वैद्यकीय क्षेत्रातील बदल व आधुनिक साधनांचा वापराच्या पद्धती जाणून घेतल्या.
विद्याथ्र्यानी उंटावद सुतगिरणीला भेट देत तेथील कामांसह यांत्रीक माहिती घेतली.
 

Web Title: Tribal students seek renovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.