धनगर समाजाला दिलेल्या सवलतींना आदिवासींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:18 IST2019-03-04T05:18:17+5:302019-03-04T05:18:27+5:30

धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सर्व आदिवासी संघटना एकवटत, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Tribal protest against the tribal community | धनगर समाजाला दिलेल्या सवलतींना आदिवासींचा विरोध

धनगर समाजाला दिलेल्या सवलतींना आदिवासींचा विरोध

नंदुरबार : धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सर्व आदिवासी संघटना एकवटत, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आदिवासी संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, आदिवासी महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. भरत वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री विविध जातींना अगदी खिरापत वाटल्यासारखे आरक्षण आणि सवलती देत आहेत. कुठलाही अहवाल, कोणतीही प्रक्रिया न करता निवडणुकीच्या तोंडावर या घोषणा होत आहेत. आता आदिवासींच्या सवलती धनगरांना देण्याचा निर्णय घेत सरकारने आदिवासींवर अन्याय केला आहे, असे आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

Web Title: Tribal protest against the tribal community