शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचूर’च्या नुकसानीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचा खरीपही आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यात विविध भागात १८ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पेरणीची ही कामे आटोपली ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यात विविध भागात १८ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पेरणीची ही कामे आटोपली असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे़ दरम्यान तालुक्यात यंदा आदिवासी शेतकऱ्यांना आमचूर उत्पादन न घेता आल्याने खरीप हंंगामासाठीची रक्कम उभी राहिली नव्हती परिणामी शेतकºयांनी किडूक-मिडूक गहाण ठेवत तसेच उसनवारी करुन पेरण्या पूर्ण केल्या आहेत़दुर्गम भागात आंबा उत्पादन हे आदिवासी बांधवांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे़ दरवर्षी सुरु होणाºया आंबा हंगामात कैºया सोलून त्या वाळवत त्यांचे आमचूर तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो़ यंदा हवामानातील बदल आणि लॉकडाऊन यामुळे हा उद्योग सुरुच झाला नाही़ झाडांवर कैºयाच न आल्याने घरोघरी आमचूर तयार करण्याची प्रक्रिया झाली नाही़ आमचूर तयार करुन त्याची विक्री केल्यानंतर येणाºया पैश्यातून सर्वच शेतकरी खरीपाचे नियोजन करत होते़ परंतू यंदा आमचूरचे उत्पन्न आले नसल्याने शेतकºयांनी उसनवारीने कर्ज घेऊन तसेच घरातील दागिने गहाण ठेवत बियाणे आणि खतांची व्यवस्था केली आहे़ गेल्या १२ जूनपर्यंत पावसाने हजेरी दिल्याने आशा पल्लवित झालेल्या शेतकºयांनी ज्वारी, उडीद, बाजरी आणि तूरसह इतर धान्य पिकांची पेरणी करण्यास वेग दिला आहे़ परंतू १० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट दुर्गम भागात आल्यास मोठ्या आर्थिक अडचणींना शेतकºयांना तोड द्यावे लागणार आहे़यंदा तालुक्यात १९ हजार ७१७ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे़ यातून आजअखेरीस तालुक्यात ३ हजार ६५२ ह्ेक्टर १८ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ तालुक्यात ४५८ हे्क्टर क्षेत्रात ज्वारी, ३४० हेक्टर क्षेत्रात तूर त्र ६७० हेक्टर क्षेत्रात उडीदाचा पेरा पूर्ण झाला आहे़ यंदा किमान २ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रात उडीदाचा पेरा होण्याची शक्यता आहे़ पावसाने साथ दिल्यास यात वाढ होणार आहे़ जिल्ह्यात नवापूरनंतर सर्वाधिक उडीद उत्पादन घेणारा तालुका म्हणून धडगाव तालुका ओळखला जातो़पावसाने योग्य ती साथ दिल्यास उडीद उत्पादनातून शेतकरी आमचूर हंगामात झालेले नुकसान भरुन काढणार आहेत़