गुरुकूलनगरात वीज तारांवर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:48 IST2020-05-30T12:48:02+5:302020-05-30T12:48:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील होळतर्फे हवेली शिवारातील गुरुकुलनगरात लिंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळल्याने विजेच्या खांबावरील तारा लोंबकळल्या ...

गुरुकूलनगरात वीज तारांवर झाड कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील होळतर्फे हवेली शिवारातील गुरुकुलनगरात लिंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळल्याने विजेच्या खांबावरील तारा लोंबकळल्या आहेत. त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
शहरात मे हिटचा तडाखा बसत असताना तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. अशातच वातावरणात वाऱ्याचा वेग वाढल्याने शुक्रवारी गुरुकुल नगरात दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास लिंबाई भवनाजवळ लिंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळले. झाड कोसळल्याने परिसरात असलेल्या एका वीज खांबावर झाडाच्या मोठ्या फांद्या अडकल्याने तारा लोंबकळल्या आहेत. परिसरात नेहमी कॉलनीतील रहिवाशांची ये-जा सुरू असते. लहान मुलेही अंगणात खेळतात. दुपारच्यावेळी उन्हामुळे सहसा नागरिक घराबाहेर पडत नाहीत. अन्यथा कोसळलेल्या झाडामुळे अनेकांना इजा झाली असती. लोंबकळणाºया तारांबाबत श्याम जगदाळे यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीने माहिती दिली. हे झाड कोसळल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी लोंबकळणाºया तारांमुळे इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गुरुकुल नगर परिसरातील वीज खांबांवरील विद्युत तारा लोंबकळत असून त्यातच गेल्या दोन दिवसापासून वाºयाच्या वेगामुळे वीज तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उडतात. त्यामुळे येणाºया जाणाºयांना इजा पोहोचू शकते. परिसरात वीज तारा लोंबकळत असल्याने पावसाळ्यात वादळवाºयामुळे वारंवार वीजपुरवठाही खंडित होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे वीज वितरण कंपनीने या तारांना ताण देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.