शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात जिल्ह्यात २२ हजार कुपोषित बालकांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या नेहमीच वाढती राहिली आहे. कोरोना अर्थात लॅाकडाऊनच्या काळात कुपोषित बालकांची संख्या कमालीची वाढली ...

नंदुरबार : जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या नेहमीच वाढती राहिली आहे. कोरोना अर्थात लॅाकडाऊनच्या काळात कुपोषित बालकांची संख्या कमालीची वाढली होती. पोषण आहार आणि अमृत आहार योजनेच्या अंमलबजावणीवर याच काळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कोरोनापूर्वी अर्थात मार्च महिन्यात आढळलेल्या कुपोषित बालकांच्या तुलनेत जून-जुलै महिन्यात आढळलेल्या बालकांची संख्या ही तीन पट वाढली होती.

सातपुड्यातील आदिवाीस दुर्गम भागात कुपोषणाची समस्या तीव्र आहे. यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत असला तरी ही समस्या व प्रश्न मिटत नसल्याचे चित्र आहे. लॅाकडाऊनच्या काळात कुपोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला होता. पोषण आहार न मिळणे, गरोदर मातांसाठीचा असलेला अमृत आहार योजनेतील आहार न मिळणे यासह इतर समस्या निर्माण झाल्याने कुपोषित बालकांची संख्या मार्च २०२० च्या तुलनेत जून-जुलै महिन्यात ती संख्या तब्बल तिप्पट झाली होती. २०१८-१९ चा विचार केला तर एक हजार ३५९ बालके ही तीव्र अर्थात सॅम तर सहा हजार ७९२ बालके ही मध्यम कुपोषित अर्थात मॅम होती. वर्षभरात अर्थात फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये ही संख्या एक हजार ६४ तीव्र तर सहा हजार १०४ बालके ही मध्यम अर्थात मॅम श्रेणीतील कुपोषित होती. त्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात पुन्हा बालकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यावेळी हीच संख्या अर्थात तीव्र कुपोषित बालके ही तीन हजार ७६४ पर्यंत गेली होती. तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ही १८ हजार ६४४ पर्यंत गेली होती.

जिल्हा परिषदेने नुकतीच एक मोहीम राबविली होती. त्यात ग्राम बालविकास केंद्रात उपचार घेऊन सुधारणा झालेल्या बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नियमित तपासणी करण्यात आली, ज्या बालकांमध्ये तीन महिने उपचार करूनही सुधारणा आढळून आली नाही, अशा बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून पुढील संदर्भ सेवा देण्यात येत आली.

मोहिमेसाठी जिल्हास्तरावर २९१ पथके नियुक्त केली होती, त्यात २८४ वैद्यकीय अधिकारी, ५६ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १५३ आशा गट प्रवर्तक, १४ आरोग्य सहायक आणि १० स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी अशा एकूण ५१७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश त्यात होता.

विशेष मोहिमेत आढळलेल्या बालकांमध्ये सुधारणा

n जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात आलेली होती, त्यात सॅम व मॅम बालकांची स्क्रिनिंग करून तीन हजार ७१० सॅम आणि १८ हजार ६४४ मॅम बालकांचा शोध घेण्यात आला होता. या बालकांवर ग्रामविकास केंद्र तसेच, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये उपचार करण्यात आले होते. त्या बालकांमध्ये सुधारणा झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.