जलतरण तलावाच्या भिंतीवर कचरा टाकल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:20 IST2020-03-04T12:20:41+5:302020-03-04T12:20:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाजवळ कचरा टाकून घाण केल्यप्रकरणी पालिकेने तिघांविरोधात गुन्हा ...

जलतरण तलावाच्या भिंतीवर कचरा टाकल्याने गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील पालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाजवळ कचरा टाकून घाण केल्यप्रकरणी पालिकेने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे़ यापूर्वी संबधितांना सूचना देण्यात आली होती़ त्यानंतर ही कारवाई करण्यात आली़
सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संजय टाऊन हॉलच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाच्या भिंतीवर शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या थापून तसेच भिंतीलगत शेण आणि कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करण्यात आली होती़ याप्रकरणी पालिका प्रशासनाने दोघा तिघांना समजही दिली होती़ परंतू यानंतरही कचरा टाकण्याचा प्रकार सुरुच राहिल्याने राजेश माणिकसिंग परदेशी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन लक्ष्मण भिकाजी गवळी, काळू काशिनाथ गवळी आणि किसन लक्ष्मण गवळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक साळंूखे करत आहेत़