शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आठ शेळ्या ठार करणाऱ्या बिबट्यासाठी लावला सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील बिलाडी ससदे परिसरात गेल्या १५ दिवसांपासून धुमाकूळ घालत आठ शेळ्यांना ठार करणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील बिलाडी ससदे परिसरात गेल्या १५ दिवसांपासून धुमाकूळ घालत आठ शेळ्यांना ठार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अखेर पिंजरा लावला आहे. बिबट्याच्या संचारामुळे परिसरातील शेतीकामांवर परिणाम होऊन ऊसतोडणीसह शेतात पाणी भरण्याच्या कामांनाही ब्रेक देण्यात आला होता. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने वनविभागाने पिंजरे लावण्याची कारवाई पूर्ण केली. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.शहादा तालुक्यातील बिलाडी ससदे परिसरात उसाच्या वाडीत बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे दिसून आले होते. दरम्यान ससदे गावातील आदिवासी वसाहतीतील शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला होता. १ फेब्रुवारीच्या रात्री रात्रभर डरकाळ्या फोडत बिबट्याने दहशत निर्माण केली होती. हा प्रकार १५ दिवसांपासून सुरू असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वनविभागाकडे लेखी पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्या अर्जावर कार्यवाही झालेली नव्हती. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने बुधवारी उसाच्या शेतात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पिंजरा लावल्यानंतर वनविभागाने सुरक्षिततेच्या संदर्भात सूचना केल्या आहेत. या परिसरात लहान बालक, महिला यांनी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच हिंस्र प्राण्यांना पळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली आहे. यातून सतर्कता बाळण्यात येत आहे.  यावेळी वनपाल एस.एस. देसले, बी.एल. राजपूत, बी.आर.शहा, रोहिदास पावरा, लेखापाल एन.डी. गिरासे, वाहन चालक नईम मिर्झा वनमजूर भीमा चव्हाण, छबू भिल आदी उपस्थित होते. दरम्यान वनपाल बी.एल.राजपूत यांना संपर्क केला असता, बिबट्या लवकरच जेरबंद होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. बिलाडी सरपंच जवाहर पाटील, पोलीस पाटील गणेश पाटील, वसंत पाटील, कोमलसिंग गिरासे उपस्थित होते.