शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या दुरवस्थेमुळे वाहतूक होते ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील तापी नदी पुलावर दररोज वाहतूक ठप्प होत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ही ...

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील तापी नदी पुलावर दररोज वाहतूक ठप्प होत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ही वाहतूक ठप्प होते. या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने हळूवार चालतात. या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त होणे, पंक्चर होणे, तोल जाऊन ऊस खाली पडणे अशा अनेक कारणांमुळे पुलावर नेहमी वाहतूक ठप्प होते. मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ऊस वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल गेल्याने सर्व ऊस खाली पडला आणि एक ते दीड तासापर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बॅरेजवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करुन वारंवार उद्‌भवणारी ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्यांमुळे डोकेदुखी

ऊस वाहतूक करताना एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली लावल्यामुळे मागील वाहन पुढे जाण्यास अडचण येते. तसेच जास्त ऊस भरल्यामुळे काही ट्रॅक्टर लोड घेत नाहीत. परिणामी अपघात होण्याची शक्यता असते. समोरील वाहनालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी ट्रॅक्टरमालकांना सूचना देऊन ही धोकेदायक ऊस वाहतूक बंद करण्याची गरज आहे. तसेच पोलीस प्रशासनाने प्रकाशा पुलावर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमावेत, अशी मागणीही होत आहे.