नेहरू चाैकात ट्रॅक्टर ट्राॅली उलटून अपघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:26 PM2020-11-21T12:26:19+5:302020-11-21T12:26:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :     शहरातील नेहरू चौकात दुचाकीस्वारास वाचविण्याच्या नादात शेणख वाहून नेणारा ट्रॅक्टर  उलटल्याची घटना ...

Tractor trolley overturns in Nehru Chaika | नेहरू चाैकात ट्रॅक्टर ट्राॅली उलटून अपघात 

नेहरू चाैकात ट्रॅक्टर ट्राॅली उलटून अपघात 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :     शहरातील नेहरू चौकात दुचाकीस्वारास वाचविण्याच्या नादात शेणख वाहून नेणारा ट्रॅक्टर  उलटल्याची घटना शुक्रवारी घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. 
 नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली येथून  इंद्रिहट्टी येथे शेतकरी वकील आसाराम पाटील हे शेणखत घेऊन जात होते. त्यांचे ट्रॅक्टर शहरातील नेहरू चाैकातून जात असताना  अचानक  दुचाकीस्वार  ट्रॅक्टर समोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक अर्जंट ब्रेक लावल्याने शेणखताने भरलेली ट्रॉली चौकात उलटली. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. एकाच बाजूने वाहतूक वळवूनही कोंडी सुटत नव्हती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी भेट  देत  जेसीबीला पाचारण करण्याच्या सूचना केल्या.  पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी वाहतूक शाखेस माहिती दिली.  वाहतूक पोलिस चंद्रशेखर सोनवणे, महिला पोलिस जयश्री सोनवणे यांनी येथे हजेरी लावत अवघ्या काही मिनीटात वाहतूक सुरळीत केली.   सायंकाळी उशिरा जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली उचलण्यात आली.­

Web Title: Tractor trolley overturns in Nehru Chaika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.