नापिकी अन् दुष्काळाला कंटाळून आसाणे येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: August 29, 2023 18:48 IST2023-08-29T18:48:02+5:302023-08-29T18:48:58+5:30
सदर प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात नोंद आहे.

नापिकी अन् दुष्काळाला कंटाळून आसाणे येथील शेतकऱ्याची आत्महत्या
नंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथील शेतकऱ्याने नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून आत्महत्या ४२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता घडली. शेतकऱ्यांने शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
रोहिदास ओंकार पाटील (४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदा शेतकरी दुष्काळ झळांच्या संकटांचा सामना करीत आहेत. यातून डोळ्यासमोर पीक जमिनीवर आडवे पडले आहे. पिकांची आबाळ पहावत नसल्याने रोहिदास ओंकार पाटील यांनी शेतातच गळफास घेतला. रात्री आठ वाजता हा प्रकार दिसून आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.
सदर प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात नोंद आहे. दरम्यान दुष्काळी परिस्थितीला कंटाळून तीन वर्षांपूर्वी रोहिदास पाटील यांचे मोठे भाऊ सदाशिव ओंकार पाटील यांनीदेखील आत्महत्या केली होती. मयत शेतकरी रोहिदास पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपली आहेत.