शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात येण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

तोरणमाळ हे पर्यटनस्थळ घोषित केले. मात्र आता जंगलात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून सागाच्या झाडांसह इतर दुर्मीळ झाडांची मोठ्या ...

तोरणमाळ हे पर्यटनस्थळ घोषित केले. मात्र आता जंगलात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून सागाच्या झाडांसह इतर दुर्मीळ झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. तोरणमाळ परिसरात भूमाफियांनी अतिक्रमण करून जंगल गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका सातपुड्यातील पशू-पक्षी व प्राण्यांना आणि त्यांच्या अधिवासाला बसत आहे. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात पूर्वी मोठ्या संख्येने वन्यप्राणी व पक्षी अधिवास करत होते. मात्र आता याकडे प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने जंगलपट्टा नष्ट होऊन वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. एकीकडे वाढते नागरिकरण व त्यातून उद्‌भवणारे अतिक्रमण यामुळे वनविभागाला आवश्यक असणारे वाढीव मनुष्यबळ न मिळाल्याने हा अनर्थ घडतो आहे, असे सांगितले जाते. विविध झाडे, पशू व पक्ष्यांनी समृद्ध असलेल्या या परिसरात मुरुड शेख, हरडा, सागवान, सावर, पळस, शिसव, बांबू, चिंच, खैर, अर्जुन, जांभूळ, बकुळी, राजन, काकड, महू अशा विविध प्रकारच्या वनस्पती तसेच बिबट्या, तरस, रानडुक्कर, रानमांजर भेकर, कोल्हा, ससे, घोरपड असे विविध वन्यप्राणी तर पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकीळ, पावशा, सर्पगरुड, महागराज, शामा जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी असे अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि वाढते अतिक्रमण यामुळे वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

गाववस्तीकडे वन्यप्राण्यांची धाव

सातपुड्यात होणारी बेसुमार वृक्षतोड, वाढते अतिक्रमण यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे वन्यप्राणी गाववस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. यामुळे गाववस्तीत वन्यप्राण्यांकडून हल्ले होऊन पाळीव प्राणी ठार होण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.