एकमेकांवर अंडी फेकून युवकांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:15 IST2019-08-25T12:15:28+5:302019-08-25T12:15:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपसातील वादातून बसस्थानकात एकमेकांच्या अंगावर अंडी फेकून हाणामारी करणा:या चार युवकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा ...

Throwing eggs at each other and hitting youths | एकमेकांवर अंडी फेकून युवकांमध्ये हाणामारी

एकमेकांवर अंडी फेकून युवकांमध्ये हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आपसातील वादातून बसस्थानकात एकमेकांच्या अंगावर अंडी फेकून हाणामारी करणा:या चार युवकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ग्रामिण भागातून शहरातील शाळांमध्ये शिकण्यास येणा:या युवकांमध्ये 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. युवकांनी बसस्थानकातील फलाट क्रमांक आठ व नऊ वर गोंधळ घातला. एकमेकांवर अंडी फेकून मारहाण केली. यामुळे बसस्थानकात असलेल्या प्रवाशांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांना ही बाब बसस्थानकातील कर्मचा:यांनी कळविली.  
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विराज यशवंत कोकणी, रा.आष्टे, अरविंद यशवंत पवार, रा.आमरसपाडा, विकास जगन चौरे, संतोष गणेश कोकणी रा.नावली, ता.नवापूर यांच्याविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार चुनिलाल ठाकरे करीत आहे.     
 

Web Title: Throwing eggs at each other and hitting youths