एकाचवेळी तीन मोटारसायकली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:54 IST2019-07-03T11:54:36+5:302019-07-03T11:54:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारातील एका घरासमोर लावलेल्या तीन मोटरसायकली अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्रीतून ...

Three motorcycle theft simultaneously | एकाचवेळी तीन मोटारसायकली चोरी

एकाचवेळी तीन मोटारसायकली चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारातील एका घरासमोर लावलेल्या तीन मोटरसायकली अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्रीतून चोरुन नेल्याने खळबळ उडाली आह़े सोमवारी सकाळी 6 वाजता हा प्रकार समजून आला़ 
होळ शिवारातील संतोष शामभाऊ पवार यांच्या अंगणात त्यांची 45 हजार रुपये किमतीची एमच 20 ईएफ 6896, त्यांचे शेजारी संजय पाटील यांच्या मालकीची 25 हजार रुपये किमतीची एमएच 39 एए 1621 व संजय नानकर यांच्या मालकीची 20 हजार रुपये किमतीची एमएच 18 एयू 3371 ह्या दुचाकी लावल्या होत्या़ 30 जून ते 1 जुलै या दरम्यान रात्री अज्ञात चोरटय़ांनी तिन्ही मोटरसायकली चोरुन नेल्या़ सोमवारी सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीसात धाव घेतली़ याबाबत संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़ 
दोन दिवसांपूर्वीच होळ शिवारात शनि छाया नगरात साधारण तीन लाख रुपयांची घरफोडी झाली होती़ त्यांनतर तीन मोटारसायकली चोरीला गेल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आह़े होळ तर्फे हवेली शिवारातील गुरुकुल नगर 1 आणि 2 तसेच विविध रहिवासी वसाहतीत दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आह़े 
 

Web Title: Three motorcycle theft simultaneously