नंदुरबार जिल्ह्यात पाच वर्षात साडेतीनशे घरफोडय़ा तर सव्वाशेंची उकल

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: March 14, 2018 11:46 AM2018-03-14T11:46:47+5:302018-03-14T11:46:47+5:30

क्राईम रिपोर्ट : लगतच्या राज्यांतील गुन्हेगारांचाही समावेश

Three hundred and fifty houses in Nandurbar district and Savvash peak of five years | नंदुरबार जिल्ह्यात पाच वर्षात साडेतीनशे घरफोडय़ा तर सव्वाशेंची उकल

नंदुरबार जिल्ह्यात पाच वर्षात साडेतीनशे घरफोडय़ा तर सव्वाशेंची उकल

Next

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 14 : संपूर्ण जिल्हाभरात चोरटय़ांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आह़े गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात एकूण 360 घरफोडय़ा झाल्या आहेत़ तर या प्रकरणी पोलिसांनी 125 गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना जेरबंद केले आह़े यामध्ये 2014 साली जिल्ह्यात सर्वाधिक घरफोडीच्या घटना घडल्या असून एकाच वर्षात तब्बल 84 घरे फोडण्यात आली आह़े तर 2013 साली सर्वाधिक कमी म्हणजे 58 घरफोडीच्या घटना घडल्या असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली़ पोलिसांची डोकेदुखी वाढली.
गेल्या पाच वर्षात म्हणजे 2013 ते 2017 मध्ये एकूण 360 घरफोडय़ांच्या घटना घडल्या आहेत़ त्यापैकी केवळ 125 घरफोडय़ांचीच उकल, शोध घेण्यास पथकाला यश आले आह़े त्यामुळे अजूनही 235 प्रकरणी आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करणे व चोरी केलेला ऐवज ताब्यात घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनासमोर आह़े सततच्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलीस कर्मचा:यांची डोकेदुखी वाढली आह़े त्याच प्रमाणे बहुतेक घरफोडय़ांच्या घटना हिवाळ्यात व लगAसराईत होत असल्याचेही जाणकारांकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानेही चांगलीच कंबर कसली असल्याचे सांगण्यात आल़े
बीट मार्शलची गस्तही कुचकामी
रात्रीच्या घरफोडीच्या घटना थांबाव्या यासाठी पोलीस प्रशासनाकडून बीट मार्शलची नियुक्ती करण्यात आली आह़े परंतु त्याचाही फारसा उपयोग होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे पोलीस गस्त अधिक वाढवावी अशीही मागणी आता होत आह़े
घरफोडीसोबतच नंदुरबार शहरात दुचाकी चोरटय़ांनीही उच्छाद मांडला आह़े गेल्या महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेतर्फे तीन टोळ्यांकडून चोरीस गेलेल्या तब्बल 52 दुचाकी जप्त करण्यात आल्या आह़े या दुचाकी गुजरात तसेच मध्यप्रदेश राज्यात विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़ेसततच्या घरफोडय़ांबाबत नंदुरबार पोलिसांकडून सर्वाधिक लक्ष गुजरात व मधप्रदेश या लगतच्या राज्यांकडे केंद्रीत करण्यात येत असत़े घरफोडय़ांमध्ये जिल्ह्यातील गुन्हेगारांचा हात असला तरी बहुतेक गुन्हेगार हे घटनास्थळावरुन पसार होत गुजरातेत जात असतात़ त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी येथील पोलीस कर्मचा:यांना लगतच्या राज्यात सतत जावे लागत असत़े
वाढत्या बेरोजगारीमुळे जास्तकरुन युवक वर्ग घरफोडीसारखे गुन्हे करण्यास बळी पडत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आल़े यात, 18 ते 25 वयोगटातील युवकांचा मोठय़ा संख्येने सहभाग असतो़ दुचाकी चोरी करण्यामध्ये सराई गुन्हेगारांचा हातखंडा आह़े येथून चोरलेली दुचाकी गुजरात तसेच मध्यप्रदेश राज्यात निम्म्या भावात विकण्यात येत असत़े त्यामुळे यातून चोरटय़ांनाही चांगलेच ‘माजिर्न’ मिळत असल्याचे सांगण्यात आल़े अनेक घरफोडींच्या घटनांमध्ये बहुतांशी आरोपी हे जिल्ह्यातीलच असल्याचे सांगण्यात आल़े
 

Web Title: Three hundred and fifty houses in Nandurbar district and Savvash peak of five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.