नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत तीन दिवसीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:11+5:302021-01-19T04:33:11+5:30
नंदुरबार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, राज्यस्तरावरून संचालक डॉ. नेहा बेलसरे, नाशिकचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी ...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत तीन दिवसीय वेबिनार
नंदुरबार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, राज्यस्तरावरून संचालक डॉ. नेहा बेलसरे, नाशिकचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी वेबिनारमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन केले. तीन दिवसीय वेबिनारसाठी राज्यस्तरावरील शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यात क्वेस्ट संस्थेचे नीलेश निमकर यांनी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका डॉ. कविता साळुंखे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व प्राथमिक शिक्षण, संगमनेरचे संदीप वाकचौरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आव्हाने आदी विषयांवर मार्गदर्शन केले. वेबिनारसाठी नंदुरबार माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, आदिवासी विभाग प्रकल्प नंदुरबार व तळोदा, महिला व बालविकास विभाग, समाजकल्याण विभाग या विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी यांनी या तीन दिवसीय वेबिनारचा ऑनलाइन लाभ घेतला. प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत नोंदणी केलेल्या सहभागी झालेल्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वेबिनारसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छींद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर. रोकडे यांनी मार्गदर्शन केले. वेबिनारसाठी नोडल अधिकारी प्रवीण चव्हाण, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता बी.आर. पाटील, डॉ. वनमाला पवार, पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे व सर्व विषय सहायक यांनी प्रयत्न केले.