शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

तीन भाजप, दोन काँग्रेस तर एक सेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवडीत भाजपने सहा पैकी तीन ठिकाणी बाजी मारली. दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवडीत भाजपने सहा पैकी तीन ठिकाणी बाजी मारली. दोन ठिकाणी काँग्रेसला यश आले तर शिवसेनेने एक पंचायत समिती राखली. काठावर बहुमत असलेल्या शहादा व नवापूर पंचायत समितीत अनुक्रमे भाजप व काँग्रेसने यश मिळविले तर तळोद्यात दोन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी अडीच वर्षांचा फार्म्यूला अंतिम ठरला.सहाही पंचायत समितींसाठी गुरुवारी सभापती, उपसभापतीपदाची निवड झाली. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती. २ वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. ३ वाजता सभा होऊन सभापती, उपसभापतींची निवड करण्यात आली.नंदुरबारात भाजप बिनविरोधनंदुरबार पंचायत समितीत भाजपचे सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपतर्फे प्रकाश कृष्णराव गावीत, काँग्रेसतर्फे संतोष साळवे यांनी तर उपसभापतीपदासाठी भाजपतर्फे लता पटेल व शिवसेनेतर्फे धर्मेंद्रसिंग परदेशी यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे येथे निवडणूक होईल असे वाटत असतांना माघारीच्या मुदतीत सभापतीपदासाठी संतोष साळवे यांनी तर उपसभापतीपदासाठी परदेशी यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे प्रकाश गावीत सभापती तर भाजपच्याच लता पटेल या उपसभापतीपदी बिनविरोध झाल्या. तीन वाजता झालेल्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. सभेला शिवसेना व काँग्रेसचे सदस्य अनुपस्थित होते.तळोद्यात प्रत्येकी अडीच वर्षांचा फार्म्यूलापंचायत समितीत दहा जागांपैकी भाजपला व व काँग्रेसला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपसात समजोता करून प्रत्येकी अडीच वर्षांसाठी सभापती, उपसभापतीपद वाटून घेतले. त्यामुळे पहिल्या वर्षासाठी भाजपचा सभापती व काँग्रेसचा उपसभापती तर दुसऱ्या अडीच वर्षांसाठी काँग्रेसचा सभापती व भाजपचा उपसभापती या फार्म्यूल्यावर एकमत झाले. त्याआधी सभापतीपदासाठी काँग्रेसचे लताबाई वळवी व उपसभापतीपदासाठी विजय राजपूत यांनीही अर्ज भरला होता. परंतु तडजोडीमुळे दोघांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज राहिल्याने भाजपचे यशवंत ठाकरे यांची सभापतीपदी तर काँग्रेसच्या लताबाई वळवी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.शहाद्यात भाकपमुळे भाजपची सत्तायेथील पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपाच्या बायजाबाई उपसभापती रवींद्र पाटील विजयी झाले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव सदस्य योगेश पाटील हे गैरहजर राहिल्याने पंचायत समितीत भाजपाची सत्ता आली.सभापतीपदासाठी भाजपतर्फे लोणखेडा गणातील सदस्या बायजाबाई प्रताप भिल यांनी तर काँग्रेसतर्फे सूलतानपूर गणातील सदस्या रमणबाई शिवाजी पवार यांनी तसेच उपसभापती पदासाठी भाजपतर्फे रवींद्र रमाकांत पाटील तर काँग्रेसतर्फे शिवाजी मोतीराम पाटील यांनी अर्ज दाखल केले. दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. यात सभापतिपदासाठी भाजपच्या बायजाबाई भिल यांना १४ तर काँग्रेसच्या रमणबाई शिवाजी पवार यांना १३ मते मिळाली. तसेच उपसभापती पदासाठी भाजपचे रवींद्र रमाकांत पाटील यांना १४ तर काँग्रेसचे शिवाजी मोतीराम पाटील यांना १३ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव सदस्याने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ हे तेरा झाले होते.नवापूरात काँग्रेसची बाजीयेथील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदावर कॉग्रेसचे अनुक्रमे रतिलाल रतन कोकणी व अंशिता उदेसिंग गावीत यांची बहुमताने निवड करण्यात आली.सभापतीपदासाठी भाजपतर्फे राजेश पद्दमाकर गावीत यांनी व उपसभापती पदासाठी ललीता किसन वळवी यांनी नामनिर्देशन दाखल केले. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षा तर्फे सभापती पदासाठी रतीलाल रतन कोकणी तर उपसभापती पदासाठी अंशीता उदेसिंग गावीत यांनी नामनिर्देशन भरले. हात उंचावुन मतदान घेण्यात आले. त्यात भाजपाच्या दोघा उमेदवारांना नऊ तर कॉग्रेस उमेदवारांना ११ मते मिळाली. बहुमत असलेली ११ मते मिळाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी सुनिता जºहाड यांनी कॉग्रेस पक्षाचे रतिलाल कोकणी व अंशिता गावीत यांना अनुक्रमे सभापती व उपसभापती पदी निवड घोषीत केली.धडगावला शिवसेनाधडगाव पंचायत समितीत शिवसेनेला बहुमत असल्यामुळे बिनविरोध निवड शक्य होती. त्यानुसार सभापतीपदासाठी हिराबाई रवींद्र पराडके यांनी अर्ज दाखल केला होता तर उपसभापतीपदासाठी भाईदास कर्मा अत्रे यांनी अर्ज दाखल केला. दोघांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर शिवसेनेतर्फे येथे जल्लोष करण्यात आला.अक्कलकुवात काँग्रेसअक्कलकुवा पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे या ठिकाणीही एकतर्फी निवड झाली.सभापतीपदासाठी मनिषा राजेंद्र वसावे यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपसभापतीपदासाठी विजयसिंग सामा पाडवी यांनी अर्ज दाखल केला. दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.नवापूर, शहादा, नंदुरबार येथे अटीतटीची स्थिती होती. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सूकता होती. शहादा व नवापूर येथे मतदान घेण्यात आले. नंदुरबारात ऐनवेळी बिनविरोध निवड झाली. तळोद्यात मात्र ऐनवेळी फिप्टी-फिप्टीचा फार्म्यूला ठरविण्यात आला. त्यामुळे कुठे पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत कुठे जोरदार संघर्ष व अटीतटी दिसून आली तर कुठे सामंजस्याचे चित्रही दिसून आले. राजकारणात काहीही घडू शकते हे त्याचेच उदाहरण ठरले.