खासदार गावीत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 05:13 IST2018-08-07T05:12:56+5:302018-08-07T05:13:26+5:30

खासदार डॉ. हीना गावीत यांच्या वाहनावर धुळे येथे मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्याप्रकरणी धुळ्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Three arrested on the incident of MP Gavit | खासदार गावीत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

खासदार गावीत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

नंदुरबार/धुळे : खासदार डॉ. हीना गावीत यांच्या वाहनावर धुळे येथे मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्याप्रकरणी धुळ्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गावीत यांनी लोकसभेत मुद्दा मांडल्यानंतर अटक केलेल्या तिघांवर संध्याकाळी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दुपारी आदिवासी समाज आणि भाजपा पदाधिकाºयांनी निषेध मोर्चा काढला व जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी रविवारच्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली .

Web Title: Three arrested on the incident of MP Gavit

टॅग्स :Arrestअटक