शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठिकाणी घरफोडीत हजारोंचा ऐवज लपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये चोरटय़ांनी 56 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. होळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये चोरटय़ांनी 56 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. होळ शिवारातील ओमसाई पार्क आणि कोरीटरोडवरील जमनादास पार्क येथे या घटना घडल्या.शहरात सध्या घरफोडींचे सत्र सुरू आहे. दिवाळीपासून हे सत्र  सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 11 रोजी देखीेल दोन ठिकाणी चोरटय़ांनी घरफोडी केली. होळ शिवारात असलेल्या ओमसाई पार्क मधील प्लॉट क्रमांक 121 मध्ये पहिली घटना घडली. सुरेश हरी जरे यांच्या बंधूंचे हे घर आहे. ते बाहेर गावी गेल्याने चोरटय़ांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 35 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागीने आणि दहा हजार रुपये रोख असा 45 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसात  सुरेश हरी जरे यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. तपास फौजदार पवार करीत आहे. दुसरी घटना कोरीट रस्त्यावर जमनादास पार्क येथे घडली. प्रशांत श्रीराम पाटील हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे   कुलूप तोडून आत प्रवेश  केला. घरातील 10 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागीने चोरून  नेले.याबाबत प्रशांत पाटील यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धनगर करीत  आहे.