शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण विश्व कोरोनामुक्त व्हावे यासाठी करताहेत प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

इस्लाम धर्मात रमजान महिन्याला बरकतीचा महिना असेही म्हटले जाते. संयम, त्याग, शांतता, सहिष्णुता, चांगुलपणा प्रामाणिकपणा रुजविणाऱ्या या महिन्याला मुस्लिम ...

इस्लाम धर्मात रमजान महिन्याला बरकतीचा महिना असेही म्हटले जाते. संयम, त्याग, शांतता, सहिष्णुता, चांगुलपणा प्रामाणिकपणा रुजविणाऱ्या या महिन्याला मुस्लिम धर्मामध्ये महत्त्व आहे. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव अल्लाह (ईश्वराची), इबादत (प्रार्थना) करतात. इस्लामी वर्ष हे चंद्रावर आधारित असल्याने यातील महिने नेहमी फिरत असतात. ३ वर्षात ऋतूचे एक चक्र पूर्ण होते. त्यामुळे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूत पवित्र रमजान येत असल्याने यावर्षी उन्हाळ्यात आला आहे. भर उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना रखरखत्या उन्हात किमान १४ तासांचा रोजा राहणार आहे. इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार प्रत्येकाला रोजे ठेवून अल्लाहची इबादत करणे बंधनकारक आहे. रोजाचा उपवास म्हणजे आत्म्याचे, आचार-विचाराचे शुद्धीकरण होय. मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान मुबारकचा मुकद्दस महिना नववा असतो. प्रत्येक घरातील लहानथोर मंडळी रोजा ठेवून अल्लाहची इबादत करतात. रोजाच्या अवस्थेत अन्नपाणी सेवनाला सक्त मनाई आहे. पोटाची भूक, पाण्याची तहान याची जाणीव प्रत्येक रोजा करणाऱ्याला व्हावी यासाठी इस्लामने रोजे अनिवार्य केले आहेत. पहिल्या रोजाला बुधवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुरुवात झाली. संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी रोजा सोडण्यात येत असून रोजे करणाऱ्याला १५ तास अन्नपाण्याविना इतरही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. या पवित्र महिन्याच्या दिवसांमध्ये पवित्र कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन केले जाते. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव मशिदीत न जाता घरातून नमाज अदा करून अल्लाहची इबादत करत आहेत.

पृथ्वीवरील कोरोनाचे संकट दूर होऊन शांती प्रस्थापित व्हावी यासाठी या पवित्र महिन्यात अल्लाहकडे विशेष दुआ मागण्यात येत आपल्याची प्रतिक्रिया मुस्लिम धर्मगुरूंच्या वतीने देण्यात आली आहे.