शेतसारा व परिक्षा शुल्क होणार माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:15 IST2019-11-22T12:14:55+5:302019-11-22T12:15:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरमध्ये चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक:यांना जमीन महसुलात ...

शेतसारा व परिक्षा शुल्क होणार माफ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरमध्ये चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक:यांना जमीन महसुलात सुट व शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतक:यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्कात माफी या सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जारी केले आहेत.
राज्यात ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील शेतीपिकांचे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतक:यांना मदत व इतर सवलती देण्यासंदर्भात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सुट व शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतक:यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्कात माफी या सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. वरील सवलती लागू करण्याबाबत सर्व संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिका:यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यातील कोणत्या गावांमध्ये या सवलती मिळतील याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कारण अतिवृष्टीच्या पंचनाम्यांमध्येही अनेक ठिकाणी टाळाटाळ झाल्याने ही सवलत तरी मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.