बंदचे नियम पाळत दैनंदिन कामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:04 PM2020-03-24T12:04:22+5:302020-03-24T12:04:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनता कर्फ्यूनंतर काही जीवनावश्यक बाबी वगळता लॉकडाऊन करण्याी घोषणा करण्यात ...

There was a crowd in the banks too | बंदचे नियम पाळत दैनंदिन कामात व्यस्त

बंदचे नियम पाळत दैनंदिन कामात व्यस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनता कर्फ्यूनंतर काही जीवनावश्यक बाबी वगळता लॉकडाऊन करण्याी घोषणा करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीही सहभागी झाला होत आहे. दुर्गम भागातील नागरिकाचही प्रतिसाद लाभत आहे. ही या बंदच्या नियमांचे पालन करीत व कुठेही न जाता ते काही दैनंदिन कामात व्यस्त असल्याचे दसून येत आहे.
जगभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. शासनासह जनतेकडूनही याची दक्षता घेतली जात आहे, या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देश एक दिवस तर देशातील जिवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय व सेवा देखील बंद करण्यात आल्या आहे.
दुर्गम भागातील धडगाव व मोलगी परिसरातील व्यापारी व सर्वसामान्य जनता देखील या बंदमध्ये सहभागी झाले आहे. या भागातील नागरिकांनी बंदनिमित्त कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर पडले नसल्यामुळे तेथील नागरिकांची अनेक दैनंदिन कामेही प्रलंबित राहिली आहे. शासनामार्फत महत्वाच्या कारणासाठी बंद पाळण्यात येत असल्याने जीवनावश्यक असली तरी नागरिकांनी या कामांपेक्षा बंदलाच अधिक प्राधान्य दिले आहे.
अवघा देश बंद असल्याने या नागरिकांची कामे होणार, नसल्याची त्यांनीही जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी घरीच राहण्याची निर्णय घेतला, परंतु घरी राहुन आवश्यक ती कामे देखील व्हावी, यासाठी दुर्गम भागातील नागरिक त्या कामांमध्ये व्यस्त दिसून आले. त्यात दाबपाणी ता. धडगाव येथील नागरिकांकडून निवाऱ्यासाठी लागणारा कुड निर्मितीची कामे हाती घेण्यात आली आहे.
खरं तर दाबपाणी येथे कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव होईल, अशी परिस्थितीच नाही. नैसर्गिक हवा, पाणी एकुणच वातावरण आरोग्यासाठी पोषक असून तेथील नागरिकांना कोरोनाविषयी फारशी कल्पना देखील नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशा कही कारणांमुळेच कुड निर्मितीची कामे तेथील नागरिकांनी हाती घेतले असावे, असेही दिसून येत आहे. धडगाव तालुक्यातील खुंटामोडीचा दाबपाणीपाडा येथील नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने कुडाचे काम करण्यात येत आहे. या कामात रामा वळवी, विक्रम वळवी यांच्यासह वळवी परिवारातील अन्य सदस्यही सहभागी झाले होते. असेही कुड निर्मितीसाठी याच कालावधीत मोकळीक असून घराची व कुड निर्मितीची कामेही याच कालावधीत केली जात असल्याने सद्यस्थितीत ही कामे सुरू आहे.

४सातपुडा व विंद्य पर्वत रागांमध्ील आदिवासी बांधवांना सिमेंटच्या भिंती फारशा परवडत नाही. शिवाय प्रतिकुल भौगोलीक परिस्थितीमुळे अशा भिंती बांधताही येत नाही, त्यामुळेच बांबूच्या कुडाचा भिंत म्हणून वापर करण्यात येत आहे.
४कुड हा पर्यावरणपुरक असल्याने याचाच अवलंब केला जात आहे. गरजून कुटुंबाकडून होळीनंतरच कुड निर्मितीची कामे हाती घेतली जातात. होळी संपताच ठिकठिकाणी कुडासह अन्य कामेही हाती घेण्यात आली आहे.

Web Title: There was a crowd in the banks too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.