वर्षभरात एकही मरणोत्तर नेत्रदान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:45 IST2019-06-10T12:45:54+5:302019-06-10T12:45:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्ष भरात एकही व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान झाले नाही. मात्र 1998 ते 2017 ...

वर्षभरात एकही मरणोत्तर नेत्रदान नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्ष भरात एकही व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान झाले नाही. मात्र 1998 ते 2017 पयर्ंत नेत्रदान करण्यांचे शतक पार झाले आहे. नेत्रदान करण्यासाठी आता किमान 65 वर्ष वयाची अट असल्याने गेल्या वर्ष भरात घट झाल्याचे दिसून येत आहे. रक्तदान, देहदान याप्रमाणे नेत्रदान देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते.
प्रख्यात नेत्रशल्य विशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.10 जुन रोजी जागतिक दृष्टिदान दिवस साजरा करण्यात येतो. आजच्या जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नेत्रदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. डोळे ही निसगार्ने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. दुर्दैवाने काही लोकांना विविध कारणांनी अंधत्व आल्याने दृष्टीपासूपासुन वंचित राहावे लागते. परंतु नेत्रदानाबाबत अद्यापही काही गैरमसज आहेत. जिल्ह्यात ही चळवळ ब:यापैकी रुजली आहे.
1 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने नेत्रदान प्रचार आणि प्रसारासाठी गेल्या दिड तपाचे योगदान दिले आहे. ‘विना दृष्टी नाही सृष्टी’ या चार शब्दात दृष्टीने आपले विश्व व्यापले आहे.
जीवनात मृत्यू अटळ आहे. मृत्यू हा वय, लिंग, धर्म, जात, रंग, गरीब, श्रीमंत, याला महत्त्व देत नाही. रिवाजाप्रमाणे मृत्यू झाल्यास दहन किंवा दफन करुन शरीराची विल्हेवाट लावली जाते.
मात्र नाशवंत शरीरातील काही भाग मरणोत्तर दान केले तर त्याचा उपयोग मरणासन्न चार ते पाच रुग्णांना होतो. जसे नेत्रदान, किडनीदान ,लिव्हर दान, हृदय दान याचा समावेश आहे.
नेत्ररोपण करणा:या हडपसर (पुणे) येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयातर्फे वयाची अट घालण्यात आली. एक दिवसाचे शिशु ते 65 वर्षाच्या आतील कोणीही नेत्रदान करू शकतो.
नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीत डॉ. अजरुन लालचंदाणी, सुरेश जैन, महादू हिरणवाळे कार्यरत आहेत. इच्छुकांनी नेत्रदानासाठी संकल्प करणे आता गरजेचे आहे. मृत्यू नंतर डोळे दान करण्याचा संकल्प करणे व नातेवाईकाकडून तो पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करावी.
यासाठी लेखी संकल्पपत्र भरणे व त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे आवश्यक असते. मृत व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा नेत्रदानासाठी संमती देउ शकतात असे महादू हिरणवाळे यांनी सांगितले.
वयाच्या अटीमुळे नेत्रदान चे प्रमाण घटले तरी देखील गेल्या 20 वर्षात पावणे दोनशे जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. यातुन पावणे चारशे जणांना दृष्टी मिळाली आहे. 65 वर्षावरील व्यक्तीचे नेत्रदान नाकारण्यात आल्यामुळे आता कमी वयात अकस्मात मृत्यु झाल्यास उदा. अपघात, आत्महत्या, विषप्राशन आदी कारणामुळे मृत्यू झाल्यास नेत्रदान करण्यासाठी नातेवाईक यांचे समुपदेशन आणि जनजागृतीसाठी प्रय} होणे आवश्यक आहे.