शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर महाविद्यालयातून साडेचार लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरूवारी रात्री दोन 2.20 ते 2.40 वाजेच्या दरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरूवारी रात्री दोन 2.20 ते 2.40 वाजेच्या दरम्यान चार लाख 40 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली.महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपीक मीना अनिलभाई शाह यांनी नवापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, महाविद्यालयाचे शिपाई विजय कुलकर्णी यांनी गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास महाविद्यालयाचे कार्यालय उघडले असता कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यावर लावलेले कुलूपच गायब होते. कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. लेखा विभागाच्या दोन कपाटात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यातील बरीचशी कागदपत्रे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली होती. त्यातील एका कपाटात ठेवलेले चार लाख 30 हजार 800 रुपये चोरटय़ांनी काढून नेले. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा कामाचा मेहनताना रक्कम वाटप करण्यासाठी ही रक्कम काढण्यात आली होती. मुख्य लिपीक प्रकाश बाविस्कर        यांनी दैनंदिन खर्चासाठी दुस:या कपाटात रोख नऊ हजार 800 रुपये ठेवले होते. ती रक्कमही चोरटय़ांनी चोरुन नेली.  महाविद्यालय आवारात सात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. चोरटय़ांनी कार्यालयासमोरील सीसीटीव्ही         कॅमेरा उलटा करून ठेवला तर कार्यालयातील एक कॅमेरा आत प्रवेश केल्यानंतर एका चोरटय़ाने फिरवून दिला. सुमारे 25 मिनिटे शांत डोक्याने चोरी करुन पळून जाण्याआधी चोरटय़ांनी सुमारे पाच हजार रुपये किमतीचा एका संगणक संचाचा सीपीयू चोरुन नेला. कॅमे:यांची रेकार्डीग त्या सीपीयूमध्ये होत असावी या आशंकेने त्याची चोरी झाल्याचा कयास लावला जात आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती नवापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली.  नंदुरबार येथून मोती नामक प्रशिक्षित श्वानाने महाविद्यालयाच्या उत्तरेकडील भागात एका कॉम्प्लेक्ससमोर पावेतो माग दाखविला. ठसे तज्ञांच्या पथकाने ठसेही घेतले.

महाविद्यालयाच्या कार्यालयातील दोन सीसीटीव्ही कॅमे:यात दोन चोरटय़ांचे चेहरे आले आहेत. पोलिसांनी त्याचा धागा पकडून तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. नवापूरचे सहायक पोलीस निरीक्षक डी.एस. शिंपी, पो.कॉ.अजय बाविस्कर, प्रवीण मोरे, योगेश थोरात, वाघ यांनी घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास हाती घेतला आहे.