नंदुरबारात 53 हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:01 IST2019-09-24T12:00:54+5:302019-09-24T12:01:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात बागवान गल्लीतील  घरातून चोरटय़ांनी 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 22 रविवारी पहाटे ...

Theft of 53 thousand in Nandurbar | नंदुरबारात 53 हजारांची चोरी

नंदुरबारात 53 हजारांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात बागवान गल्लीतील  घरातून चोरटय़ांनी 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 22 रविवारी पहाटे उघडकीस आली़ 
बागवान गल्लीतील जाकीरहुसेन महंमद हुसेन बागवान यांच्या घरात शनिवार मध्यरात्र ते रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरटय़ांनी प्रवेश करत घरात ठेवलेले 34 हजार रुपये किमतीचे 4 मोबाईल, 9 हजार 700  रुपये रोख आणि 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पदक असा ऐवज चोरुन नेला़ चोरीची घटना घडली त्यावेळी जाकीर हुसेन बागवान आणि त्यांचे कुटूंबिय घरातच झोपले असल्याची माहिती आह़े त्याचा फायदा घेत चोरटय़ांनी चोरी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आह़े  
याबाबत जाकीर हुसेन बागवान यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बि:हाडे करत आहेत़ घटनेमुळे खळबळ उडाली आह़े 
 

Web Title: Theft of 53 thousand in Nandurbar