शुक्रवारपासून नंदुरबारात रंगणार नाट्योत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:09 IST2020-01-02T12:01:41+5:302020-01-02T12:09:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय ...

Theatrical festival will be held in Nandurbar from Friday | शुक्रवारपासून नंदुरबारात रंगणार नाट्योत्सव

शुक्रवारपासून नंदुरबारात रंगणार नाट्योत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा सुरु होत आहे. यात राज्यभरातून २१ नाट्यसंस्था सहभागी होणार आहे.
नांदुरबारात ३ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा अयोजित केल्या आहे. यासाठी महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमळनेर, जळगांव, भुसावळ, धुळे, चोपडा, एरंडोल, उल्हासनगर येथील नाट्यसंस्था शिवाय इंदौरहुनही सहभागी होणार असून २१ एकांकीकांची नोंदणी झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कल्चरल अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, दिग्दर्शक शाम रंजनकर, उद्योजक आनंद जैन, किरण तडवी, मिलिंद पहुरकर, शितल पटेल, नवोदय विद्यालयाचे सुरेंद्र देवरे, नगरसेवक रविंद्र पवार, डॉ.राजकुमार पाटील, संजय चौधरी, पत्रकार रमाकांत पाटील, रणजीत राजपूत, नरेश नानकानी, रोटरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ५ जानेवारी मागील परिक्षकांचा परिसंवाद होणार आहे.
यात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, गंगाराम गवाणकर, प्रशिक्षक शिवदास घोडके, अभिनेता आत्माराम बनसोडे, अभिनेत्री निला गोखले, नाटककार कुंदा निलकंठ, अभिनेता वीरा साथीदार, अ‍ॅकेडमी आॅफ थिएटर आर्टस् विद्यापीठाचे डॉ.मंगेश बनसोडे, प्रसारण मंत्रालयाचे डॉ.जितेंद्र पानपाटील, शशिकांत बºहाणपूर आदी सहभागी होणार आहे. तर दुपारी २ वाजता बक्षिस वितरण होणार आहे.
तीन दिवसात सादर होणाऱ्या एकांकीकांचे परीक्षण नाटककार अजित भगत, नाट्य दिग्दर्शक दत्ता पाटील, नाटककार रविंद्र लाखे हे करणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हावासियांना एकांकीकेची मेजवानीच मिळणार आहे. याचा नाट्यरसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन नागसेन पेंढारकर, मनोज पटेल, मनोज सोनार, राजेश जाधव यांनी केले आहे.

४जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दिला जाणारा ‘दिपस्तंभ’ पुरस्कार यंदा शहादा येथील रंगश्री गृपचे संस्थापक ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ.शशांक कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे.
४स्पर्धेदरम्यान प्रसिद्ध हास्य कलाकार विलासकुमार शिरसाठ यांची तुफान स्टॅण्डअप कॉमेडीचा कार्यक्रम ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
४दि. ५ जानेवारीलाच सायंकाळी ७ वाजता डॉक्टरांनी तयार केलेला हिंदी लघुपट ‘काश’ याचे प्रदर्शन होणार आहे.

 

Web Title: Theatrical festival will be held in Nandurbar from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.