ठाणेपाडा तलावाच्या भिंतीला पडले भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:43 IST2019-08-14T12:43:47+5:302019-08-14T12:43:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळील पाझर तलावातून पाणी पाझरण्यास सुरुवात झाल्यानंतर ते फुटल्याची अफवा पसरली होती़ ...

ठाणेपाडा तलावाच्या भिंतीला पडले भगदाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळील पाझर तलावातून पाणी पाझरण्यास सुरुवात झाल्यानंतर ते फुटल्याची अफवा पसरली होती़ यातून प्रशासन आणि ग्रामस्थ यांची धावपळ उडाली़ वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याचे वहन करुन दिल्यानंतर तलाव फुटण्याचा धोका टळला़
ठाणेपाडा गावाच्या दक्षिण दिशेला उंचीवर 40 वर्षापूर्वी लघु तलावाची निर्मिती करण्यात आली आह़े वनविभागाच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या या तलावात यंदा मोठा जलसाठा झाल्याने ते पूर्ण क्षमतेने भरला होता़ दरम्यान रविवारी त्यातून पाणी बाहेर येत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले होत़े सोमवारी सकाळी तलावाच्या भिंतीला भगदाड पडल्याने पाण्याचा जोर वाढला होता़ यातून तलाव फुटून पाणी साक्री-नंदुरबार रस्त्यावर येऊन रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण झाली होती़ या पाण्यामुळे ठाणेपाडा गावासह परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरण्याची चिन्ह निर्माण झाले होत़े यावर मार्ग काढत वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेंद्र रघुवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच ठाणेपाडा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी भेट देत पाहणी करुन दुस:या बाजूने पाण्याला मार्ग करुन दिला़ दुस:या बाजून पाटचारी खोदत पाण्याला मार्ग करुन दिला़ हे पाणी परिसरातून वाहणा:या नदी नाल्यात गेल्यानंतर धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून पाणी येणे कमी होऊन भिंत पडण्याचा धोका टळला असल्याचे सांगण्यात आले आह़े दरम्यान वनविभागाकडून या तलावाची भिंत दुरुस्तीची कारवाई होणार आह़े