शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींची पुढील महिन्यात मुदत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

तळोदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील तब्बल ३५ ग्रामपंचायतीची मुदत पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होते ...

तळोदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील तब्बल ३५ ग्रामपंचायतीची मुदत पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होते की, मुदत वाढ दिली जाते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. सध्या २० ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचा कार्यभार केवळ पाच जणांवर असल्यामुळे कामे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तळोदा तालुक्यात ९१ गावे असून, या गावांच्या ६७ ग्रामपंचायतींमध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील ३५ ग्रामपंचायतीची मुदत पुढील महिन्यात १८ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे साहजिकच या ग्रामपंचायतींवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्रशासकाची नेमणूक केली जाते की, पुन्हा कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुदत वाढ दिली जाते. याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रतापापूर, मोड, मोदलपाडा, आमलाड अशा अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या आधीही सध्या २० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहेत. तथापि त्यांचा कार्यभार केवळ पाच अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. सरासरी एकाकडे तीन ते चार पंचायती सोपविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे एका अधिकाऱ्याकडे तर तब्बल १० पंचायतीचा भार देण्यात आला आहे. साहजिकच कामे करताना त्यांना किती कसरत करावी लागते याची प्रचिती ग्रामस्थांना येत आहे. वास्तविक प्रशासकाची नियुक्ती करताना जिल्हा परिषद प्रशासनाने सुयोग्य नियोजन करण्याची गरज होती. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींनी विकासाची कामे हाती घेतली आहे. या कामांवर संबंधितांचा वचक नसल्याने राम भरोसेच सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांविना विकासकामांना अप्रत्यक्ष खीळ बसल्याचे ग्रामीण जनतेचे म्हणणे आहे. एक तर ग्रामविकास विभागाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना मुदत वाढ द्यावी अशी मागणी होत आहे. अन्यथा एका ग्रामपंचायतीवर एकाच अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या ग्रामपंचायतीची संपत आहे मुदत

पुढील महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये मोड, बोरद, चिनोदा, भवर, बुधावल, आमलाड, छोटा धनपूर, खरवड, मोहिदा, धानोरा, खेडले, करडे, दलेलपूर, काजीपूर, चौगाव बुद्रूक, लखापूर रे, मोदलपडा, लोभाणी, मोरवड, नावगाव, न्यूबन, नळगव्हण, पिमरपाडा, प्रतापपूर, रोझवे, सलसाडी, शिर्वे, सोमावाल बुद्रूक, सोमावाल खुर्द, तळवे, तुळाजे, वाल्हेरी, झिरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील बहुसंख्य ग्रामपंचायती या ग्रुप ग्रामपंचायती असल्यामुळे त्यामध्ये अनेक गावांचा समावेश आहे. तब्बल ३५ ग्रामपंचायतींची मुदत पुढील महिना अखेरीस संपत असल्याने प्रशासनास प्रशासकाची नियुक्ती करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आधीच पंचायत समितीच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांच्या मोठा अनुशेष आहे.

पुढील महिन्याचा अखेरपर्यंत ताळोदा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. सध्या २० ग्रामपंचायतीवर प्रशासक काम करीत आहे.

- रोहिदास सोनवणे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तळोदा.

तळोदा तालुक्यातील तब्बल ३५ ग्रामपंचायतींची जुलै महिन्याच्या अखेरीस मुदत पूर्ण होत आहे. आधीच एक, एका अधिकाऱ्याकडे पाचपेक्षा अधिक पंचायती आहेत. त्यामुळे कामे करताना त्यांना अधिक ताण पडत असतो. आता एवढ्या ग्रामपंचायतींना प्रशासन देताना अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने मुदत वाढीचा विचार करावा.

- एम.बी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, बोरद, ता. तळोदा.