अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या येथे दहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 17:17 IST2018-03-25T17:17:13+5:302018-03-25T17:17:13+5:30
गुजरात राज्यात विक्री करण्याचा होता इरादा

अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या येथे दहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील पोस्ट मोरंबा जवळील तीनखुन्या येथे रविवारी 10 लाख 20 हजार 200 रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडण्यात आला़ याबाबत आरोपी राजेंद्र मधुकर वसावे (रा़ तीनखुन्या ता़ अक्कलकुवा) यांना अटक करण्यात आली आह़े नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली़
गुजरात राज्याच्या सिमेवर असलेल्या अतीदुर्गम भागातील तीनखुन्या परिसरात पकडलेला हा अवैध मद्यसाठा गुजरात राज्यात विक्री करण्याच्या इराद्याने हाताळला जात होता़ या कारवाईमध्ये मध्यप्रदेशात निर्मित व विक्रीसाठी व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे व इंपिरीयल ब्ल्यू व्हिस्कीचे एकूण 9 हजार 746 बाटल्या असलेले 201 बॉक्स जप्त करण्यात आले आह़े या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक अविनाश घरत, मनोज संबोधी, क़ेएऩ बुवा, दिनेश ठाकूर, बी़डी़ बागले तसेच जवान अविनाश पाटील, अजय रायते, संजय बैसाणे, हितेश जेठे, नीलेश शेळके, संदीप वाघ आदींचा सहभाग होता़