शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार शहादा रस्त्यावर टेम्पो व अॅपे रिक्षाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 09:50 IST

मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली.

ठळक मुद्देउसाची गाडी अचानक रस्त्यावर आल्याने ट्रकने रिक्षाला धडक दिली.

नंदुरबार -  - मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. शहादा तालुक्यातील म्हसावद येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. 

मालवाहतुक करणा-या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. रिक्षा मधील सर्व प्रवासी तलावडी येथे राहणारे आहेत.  ट्रक धडगाव येथून तर रिक्षा भोंगरा येथून येत असताना हा अपघात घडला.  

गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतणारे चौघे जागीच ठार झाले.उसाची गाडी अचानक रस्त्यावर आल्याने ट्रकने रिक्षाला धडक दिली. एकूण 15 जण जखमी झाले आहेत.  

मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यूमालेगाव-सटाणा रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपे रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सटाणा- मालेगाव रोडवर शेमळी शिवारात गुरुवारी (28 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. 

मालेगावकडून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अपे रिक्षाला शेमळी शिवारात अज्ञात ट्रकने धडक दिल्याने रिक्षातून प्रवास करणा-या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपे रिक्षाला धडक देऊन पसार झालेल्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांची अद्यापपर्यंत ओळख  पटलेली नाही.

त्यांचे मृतदेह सटाणाच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र अपघात स्थळी सापडलेली खेळणी व अन्य साहित्यावरुन सर्वजण व्यावसायिक असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सटाण्यात सुरू असलेल्या यशवंत महाराज यात्रेत खेळणी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी हे व्यावसायिक  येत असल्याचेही माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात