महिलेवर युवकाचा अतिप्रसंगचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:13 IST2018-12-10T13:13:37+5:302018-12-10T13:13:41+5:30
टेंभूर्णी येथील घटना : धडगाव पोलिसात युवकाविरुद्ध गुन्हा

महिलेवर युवकाचा अतिप्रसंगचा प्रयत्न
नंदुरबार : घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेंभूर्णी, ता.धडगाव येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, टेंभूर्णी येथील 35 वर्षीय महिला तिच्या मुलीसह राहते. पती मजुरीसाठी मध्यप्रदेश येथे गेलेला आहे. महिलेचे घर कच्चे विटांचे आहे. संशयीत सुकलाल कंडय़ा वळवी, रा.टेंभूर्णी, ता.धडगाव याने रात्रीच्या वेळी घराच्या विटा काढून घरात प्रवेश केला. मुलीसह झोपलेल्या महिलेवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला व मुलीलाही जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे सुकलाल तेथून पळून गेला. गावक:यांना महिलेने ही बाब सांगितल्यावर गावपंचायतीत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु वाद न मिटल्याने महिलेचा पती परगावाहून गावी आल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्याचे ठरले. त्यानुसार पिढीत महिलेने फिर्याद दिल्याने सुकलाल कंडय़ा वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ज्योतीबा दीपक करीत आहे. संशयीतास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.