पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:48 IST2019-08-20T12:48:23+5:302019-08-20T12:48:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्राथमिक शिक्षक पदोन्नती प्रक्रियेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक ...

Teacher's dharna agitation regarding promotion process | पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात शिक्षकांचे धरणे आंदोलन

पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात शिक्षकांचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्राथमिक शिक्षक पदोन्नती प्रक्रियेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आल़े जिल्हा परिषदेसमोर झालेल्या आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आल़े 
निवेदनात जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील बोगस अपंग व चुकीची माहिती भरुन संवर्ग 1 व 2 चा लाभ घेणा:या बोगस शिक्षक कर्मचा:यांवर कार्यवाही होऊन पाठीशी घालणा:या अधिका:यांची चौकशी करावी, अक्कलकुवा तालुका अवघड घोषित होण्यासाठी 104 गावांची पुन्हा मॅपिंग करण्यासाठी समिती नेमावी, निवड श्रेणीपासून वंचित असलेल्या 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा, चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून वेतनश्रेणी लागू करावी, तालुकास्तरावर वेतन पडताळणी शिबिर घ्यावे, 2016 नंतर चटोपाध्याय ज्यांना लागू आहे त्यांना सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन नवीन वेतननिश्चिती करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ निवेदनावर शिक्षक संघटनेच्या पदाधिका:यांच्या सह्या आहेत़ 
 

Web Title: Teacher's dharna agitation regarding promotion process