शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पतीला पत्नी व मुलाकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शिक्षक असलेल्या पतीकडे घर बांधण्यासाठी पैसे मागितल्यानंतर त्याने नकार दिला. या नकाराचा राग येऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शिक्षक असलेल्या पतीकडे घर बांधण्यासाठी पैसे मागितल्यानंतर त्याने नकार दिला. या नकाराचा राग येऊन पत्नी आणि मुलाने त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार कानडी, ता. शहादा येथे घडला आहे.  मारहाण झालेल्या पतीने पत्नी आणि मुलाविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेहरचंद शंकर राठोड असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मेहरचंद राठोड हे घरी आल्यानंतर पत्नी रुख्मिणीबाई व मुलगा दीपक यांनी घर बांधकामासाठी पैशांची मागणी केली. यावेळी मेहरचंद राठोड यांनी पैसे नसल्याचे दोघांना सांगितले. याचा राग आल्याने पत्नी रुख्मिणीबाई व मुलगा दीपक यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान जवळ पडलेली वीटही त्यांच्या डोक्यात घातली. यात शिक्षक राठोड हे जखमी झाले. या प्रकारानंतर त्यांनी थेट म्हसावद पोलीस ठाणे गाठत पत्नी व मुलाविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल रामदास पावरा करत आहेत.