सततच्या पाणीटंचाईने त्रस्त गावांना मिळाला तापीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:10 IST2019-06-09T12:10:32+5:302019-06-09T12:10:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाचा निर्धार आणि लोकप्रतिनिच्या सहकायार्मुळे नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व ...

TAPI grounds for evergreen water scarcity | सततच्या पाणीटंचाईने त्रस्त गावांना मिळाला तापीचा आधार

सततच्या पाणीटंचाईने त्रस्त गावांना मिळाला तापीचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाचा निर्धार आणि लोकप्रतिनिच्या सहकायार्मुळे नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल गावाची पाणी समस्या दूर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तापी नदीवरून सुरू केलेल्या तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजनेमुळे गेल्या तीन वषार्पासून टंचाईचा सामना करणा:या या गावातील नागरिकांना आणि पशुधनाला उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे.
नंदुरबार तालुक्यातील भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे व निंभेल या गावात गत तीन ते चार वर्षांपासून गावकरीभीषण पाणी टंचाईचा सामना करीत होते. दोन वर्षांपासून पर्जन्यमान अगदीच कमी झाल्याने भूजल पातळी अगदीच खोल गेली आहे. गावातील सर्वच विहिरी व विंधनविहिरीआटल्या असून परिसरातील सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत. या गावांना पाण्याचा आधार असलेले बलदाणे धरणही पूर्णत: आटले आहे. परिणामीपाणीटंचाईची भीषणता आणखीनच वाढली होती. या उन्हाळ्यात गावक:यांसमोरगावे सोडण्याचे संकट उभे ठाकले होते.
या भागात दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांचे स्थलांतर आणि पशुधनाचे पालनही मोठी समस्या झाली होती. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेत या गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. तापी नदीपासून 12 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकून या गावांना पाणी पुरवठा करण्यात आला.
या गावांच्या जवळपास कोणतेच पाण्याचे स्त्रोत नसल्याने, दूरवर असलेल्या तापी नदीच्या पात्रातून पाणी उचल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधी व ग्रामपंचायत स्तरावरील तातडीच्यापाणीटंचाई निवारणासाठी असलेल्या सर्व निधी, स्थानिक विकास कार्यक्रम आणि सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणा?्या निधींचाएकत्रित वापर करूनयोजना राबविण्यात आली.
प्रथम टप्प्यात तापीनदीच्या किनारी विंधनविहीर करून पाण्याची उचल करण्यात आली आणि सुमारे नऊ किलोमीटर जलवाहिन्या टाकून भादवड येथील मोठ्या विहिरीत पाणीसाठा करून या गावाची पाणी समस्या दूर करण्यात आली. त्याच विहिरीतून उद्भव घेऊन  न्याहली, बलदाणे, व कार्ली या गावांपयर्ंत साडेचार किलोमीटर जलवाहिन्या टाकून तेथील विहिरीपयर्ंत पाणी नेण्यात आले.
जलवाहिन्यांच्या मार्गात रेल्वे रूळ येत असल्याने केंद्रीयरेल्वे प्रशासनानेही पाणीटंचाईचेगांभीर्य लक्षात घेता जलवाहिन्या टाकण्याची परवानगी तातडीने दिली. या चारही गावातील एकत्रित 9,800 लोकसंख्येसाठी यशस्वीपणे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.मौजे सातुर्के येथील 1,250 लोकसंख्येला व निंभेल व कंड्रे या गावातील एकत्रित 2,640 लोकसंख्येलाही अशाच प्रकारेपाणीपुरवठा करण्यात आला.
शासनाच्या विविध निधींचामाध्यमातून तातडीने योजना राबविली गेल्यानेदुष्काळने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या घरापयर्ंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यात शासनाला यश आले आहे. भर उन्हाळ्यातपिण्याचे पुरेशे पाणी व पशुधनाच्या संगोपनासाठी लागणारे पाणी उपलब्ध झाल्याने या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.    
 

Web Title: TAPI grounds for evergreen water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.