निझर येथे स्थानिक आमदार निधीतून टँकरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:23 IST2020-01-10T12:23:45+5:302020-01-10T12:23:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील निझर जि़ तापी येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनीलभाई गावीत यांच्या निधीतून १३ ...

Tanker inauguration from local MLA fund at Nizar | निझर येथे स्थानिक आमदार निधीतून टँकरचे लोकार्पण

निझर येथे स्थानिक आमदार निधीतून टँकरचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरात राज्यातील निझर जि़ तापी येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनीलभाई गावीत यांच्या निधीतून १३ गावांसाठी टँकर देण्यात आले़ या टँकरचा लोकार्पण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाला़
प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजबसिंग वसावा, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत पटेल, जिल्हा काँग्रेसचे महामंत्री जगदीश पटेल, पंचायत समिती सदस्य दिनेश पाडवी, उदेसिंग पाडवी, माजी सभापती भानुदास पाडवी, सुनील वळवी, विजय वळवी, कालुसिंग वळवी, अ‍ॅड़ अनिल वसावे, जितेंद्र वसावा, भगवान साटोटे यांच्यासह सरपंच उपस्थित होते़ ११ लाख रुपयांच्या या टँकरमुळे तालुक्यातील सायला, पिंपळोद, व्यावल, भीलजांभोली, आडदा-खोडदा, हिंगणी, पिंपलोद, लक्ष्मीखेडा, जुनी भिलजांभोली, भवाली या गावांचा पाण्याचा प्रश्न या टँकरमुळे सोडवण्यात येणार असल्याचे तसेच विविध योजनांची कामे सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Tanker inauguration from local MLA fund at Nizar