शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा शहर आणखी तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तळोदा शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी गुरुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तळोदा शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी गुरुवारी काढले आहेत़ बाधितांच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून गुरुवारी आणखी दोन रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कांचा शोध सुरु झाला आहे़शहरातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तळोदा शहर शुक्रवारपासून तीन दिवस बंद ठेवण्यात आदेश दिले आहेत़ दरम्यान खान्देशी गल्ली व भोई गल्ली या दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे़ बुधवारी पाच रुग्ण आढळून आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांना आमलाड येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे़ यातील ५ जणांना स्वॅब देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे़ दरम्यान गुरुवारी मिरा कॉलनीतील आणखी दोघे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे़तळोदा शहरात कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे़ बुधवारी देखील मोठा माळीवाडा, खान्देशी गल्ली व भोई गल्ली या तीन ठिकाणी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत़ हे सर्व जण मयत वृद्ध महिलेच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात आले आहे़ शहरातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा तळोदा शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ शुक्रवार ते रविवार मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे़ या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत़ त्याचबरोबर शहरातील ज्यात ठिकाणी हे पाच कोरोना रुग्ण आढळून आले आहेत़ ते खान्देशी गल्ली व भोई गल्ली हे कंटेन्मेंट झोन घोषित आहेत़बुधवारी रात्रीच आरोग्य यंत्रणेने या भागातील प्रत्येक कुटूंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी हाती घेतली आहे़तळोद्यात दोन नव्या कंटेन्मेंट झोनमध्ये आतापर्यंत २०० च्या जवळपास नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे़ या भागातून क्वारंटाईन करण्यात आलेल्या ३९ जणांना आमलाड येथे दाखल करण्यात आले आहे़ यातील पाच जणांच्या स्वॅब रिपोर्टकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे़दोन्ही नव्या झोनमध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे़मीरा कॉलनी येथे गुरुवारी आढळून आलेल्या दोघा बाधितांनी खाजगी रुग्णालयात कोरोना टेस्टींग केल्याची माहिती देण्यात आली आहे़ कोरोनामुक्त असलेल्या तळोदा शहरता रुग्ण वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहेत़