संशयावरून वृद्धास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:35 IST2019-08-11T12:35:08+5:302019-08-11T12:35:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी विभागाअंतर्गत बांधण्यात आलेला मातीबांध कच्चा बांधल्याचा संशय घेवून दोघांनी वृद्धाला बेदम मारहाण केल्याची ...

Suspect kills old man | संशयावरून वृद्धास मारहाण

संशयावरून वृद्धास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कृषी विभागाअंतर्गत बांधण्यात आलेला मातीबांध कच्चा बांधल्याचा संशय घेवून दोघांनी वृद्धाला बेदम मारहाण केल्याची घटना जामली, ता.अक्कलकुवा येथे घडली. मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामलीचा चिखलीपाडा, ता.अक्कलकुवा येथील दिलीप शिवण्या तडवी यांनी गेल्या वर्षी कृषी विभागामार्फत कच्चा माती बांध बांधल्याचा संशय गावातीलच विजय खाल्या तडवी व कान्या बापू तडवी यांनी घेतला. या कारणावरून दोघांनी दिलीच्या घरी जात त्याचे वडिल शिवण्या तडवी यांच्याशी वाद घातला. त्यांनी समजविण्याचा प्रय} केला असता विजय व कान्या तडवी यांनी शिवण्या या वृद्धास लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. वृद्धाला व मुलाला ठार मारण्याची धमकी देखील दिली.  याबाबत शिवण्या तडवी यांनी फिर्याद दिल्याने दोघांविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Suspect kills old man