शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

गुजर समाज मंचतर्फे शहादा अमरधामला लाकडाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

तालुक्यात कोरोना विषाणू संक्रमणाने थैमान घातले असून गेल्या महिनाभरात दुर्दैवाने मयतांची संख्या १२५ च्या वर गेली आहे. त्यातून शहादा ...

तालुक्यात कोरोना विषाणू संक्रमणाने थैमान घातले असून गेल्या महिनाभरात दुर्दैवाने मयतांची संख्या १२५ च्या वर गेली आहे. त्यातून शहादा अमरधाममध्ये शहरासह परिसरातील मयतांवर अंत्यसंस्काराचा लोड वाढला असून तेथे लाकूड टंचाई भासू लागली. याबाबतचे मेसेज व चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाली. हाच धागा पकडून सामाजिक बांधिलकीसाठी कटिबद्ध असलेल्या गुजर समाज मंच ॲडमिन टीमच्या ग्रुपवर एका सदस्याने आपणही समाजाचे देणे लागतो. अशा कठीण प्रसंगी आपल्या टीमच्या सदस्यांच्या आर्थिक मदतीने शहादा अमरधामला पाच टन लाकूड देण्याविषयी आवाहन केले. याला ॲडमिन टीमच्या सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून १० टन लाकूड पुरवता येईल इतका स्वनिधी गोळा झाला. लाकूड खरेदी करण्यासह पोहोचविण्याची जबाबदारी टीमच्या एका सदस्यावर सोपविण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांत शहादा अमरधामला गुजर समाज मंच ॲडमिन टीमतर्फे १० टन जळाऊ लाकूड टेम्पोद्वारे पोहोच करण्यात आले.