शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेच्या नादापाई पतीनेच केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अंधश्रद्धतेून होणा:या अघोरी प्रकाराला विरोध केल्याने बामखेडा येथे पतीनेच प}ीचा गळा आवळून खून केल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : अंधश्रद्धतेून होणा:या अघोरी प्रकाराला विरोध केल्याने बामखेडा येथे पतीनेच प}ीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. गुराख्याच्या प्रसंगावधानेने अखेर खुनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली. फिर्यादी पतीच आरोपी निघाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.   दयाराम पिरा गवळे व साथीदार दासभाऊ उर्फ दाजी बिजू ठाकरे  अशी संशयीतांची नावे आहेत. शहादा तालुक्यातील बामखेडा शिवारात कलाबाई दयाराम गवळे या 52 वर्षीय महिलेचा सहा दिवसांपूर्वी गावालगत  शेतामध्ये  भरदिवसा खून झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पती व कुटूंबाने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या खुनाचा गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांना मोठे आव्हानात्मक काम होते. सारंगखेडा पोलीस, एलसीबी यांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलीस उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे यांनी आपल्या कौशल्याने तपासाला गती दिली. गावात जावून त्यांनी खुनाची माहिती देणा:याला बक्षीस देण्याचेही जाहीर केले. सहायक पोलीस निरिक्षक सरोदे हेही मागावर होते.  गवळे यांच्या कौटूंबिक बाबींची सर्व माहिती त्यांनी घेतली. त्यातून अपेक्षीत धागेदोरे काही मिळाले नाहीत. अशातच गावातील गुराखी युवकाने पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी यांना भेटून घाबरतच या खुनाबाबतची माहिती दिली. चार दिवसांपासून ूमारेकरी आणि पोलिसांचा धाक यामुळे हा युवक काहीही बोलत नव्हता. अखेर त्याला चौधरी यांनी बोलते केले असता खुनाच्या घटनेचा उलगडा झाला.शेतात शेळ्या चारत असतांना गुराखी युवकास लगतच्या गवताच्या आड काहीतरी हालचाल दिसली. त्याने तेथे जावून पाहिले असता कलाबाई यांचे पते दयाराम हे मांत्रिकाच्या सहाय्याने त्यांच्या गळ्यात ताईत बांधण्याचा प्रय} करत होते. त्याला कलाबाई विरोध करीत होत्या. गुराख्याने ही बाब पाहिल्याचे समजताच दयाराम गवळे व मांत्रिकाने त्याला दमबाजी करून तेथून जाण्यास सांगितले. नंतर त्या महिलेचा तेथे मृत्यदेह आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच दयाराम यांना विश्वासात घेवून माहिती घेतली असता त्यांनी गळ्यात बांधण्यात येणा:या ताईतानेच कलाबाई यांचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.दरम्यान, संशयीत दयाराम पिरा गवळ व दासभाऊ उर्फ दाजी बिजू ठाकरे यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

अंधश्रद्धेचा बळी.. कलाबाई यांचा अंधश्रद्धेतून बळी गेल्याचे उघड झाले आहे. ताईत कशासाठी बांधला जात होता. जंगलात त्यासाठी का नेले होते. मांत्रिक कोण होता. थेट खून करण्यार्पयत का ही बाब गेली असे एक ना अनेक प्रश्न कायम आहेत. त्याचा उलगडा आता होणार आहे. गुराखी युवकाने धैर्य दाखवत ही माहिती पोलीस पाटलांना दिल्यामुळे ही घटना उघड झाली. त्यासाठी पोलीस उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे यांचेही कौशल्य त्यासाठी कामी आले. पती दयाराम यांना ताब्यात घेण्यात आले आहे.